मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपा नेते किरीट सोमय्या यांची कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत सापडले होते. त्यानंतर काही दिवस ते प्रसिध्दी माध्यमापासूनही दूर राहिले. पण, आता पुन्हा ते मैदानात उतरले असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. त्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रात कोरोना काळात उध्दव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला १८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे या कंपनीला ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ असे २५ महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला ९० कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी १० कोटी रुपये दिले असे मिळून १०० कोटींचा घोटाळा केला. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील १५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा आरोप सोमय्या आहे.
bjp leader kirit somaiya new scam mumbai
allegation politics bmc covid mulund hospital contract