इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा विषय चांगलाच गाजत असून धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे, विरोधक आणि समर्थकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या मुलीने मुस्लिम तरुणासोबत लग्न ठरल्याची घटना गाजत असून सोशल मीडियावर या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली, त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी भाजप नेत्याचा निषेध केला. आता या नेत्याने आपल्या मुलीचे लग्न रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याचे समाजातील वातावरण या लग्नासाठी योग्य नाही, त्यामुळे ते रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की भाजप नेते पौडी नगरपालिकेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे माजी आमदार यशपाल बेनम यांनी आपल्या मुलीचे लग्न मेरठ येथील एका मुस्लिम तरुणासोबत ठरवले होते. मात्र आता या तुर्त तरी हा समारंभ रद्द करण्यात आला आहे. या बाबत मुलीच्या वडीलांनी सांगितले की, माझ्या मुलीचे लग्न तिच्या उत्तर प्रदेशातील अमेठी येथील मित्रासोबत दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने निश्चित झाले होते. मुलांचे सुख आणि भविष्य लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.
बेनम यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर यांसारखे मुद्दे उपस्थित करणाऱ्या भाजप पक्षाच्याच एका नेत्याने मुस्लिम नेत्याच्या मुलीचे लग्न लावून दिल्याच्या घटनेने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी यशपाल बेनम यांच्याविरोधात अनेक निदर्शने केली. त्याचप्रमाणे पौडी गढवाल जिल्ह्याचे विहिंपचे कार्याध्यक्ष दीपक गौर यांनी हा विवाह ‘अयोग्य’ असल्याचे म्हटले आहे.
अशा परिस्थितीत बेनम यांनी सद्यस्थितीचे कारण देत दि. २६ मे रोजी होणारा विवाह सोहळा सध्याचे वातावरण अनुकूल नसल्याने रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बेनम म्हणाले की, लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष या नात्याने मी जनतेला उत्तरदायी असून त्यांच्या भावनांचा आदर करतो. कारण या जगात सर्व प्रकारचे लोक असतात. काही माझ्याशी व्यवस्थित बोलले आणि काहींनी अरेरावीच्या भाषेत संभाषण केले. पण त्यांच्या मते त्यांचा राग बरोबर होता, तसेच माझ्या मते माझ्या मुलीबद्दलचे प्रेम योग्य आहे. त्या मुलाचे कुटुंबीय खूप चांगले आहेत. ते फक्त मुस्लीम आहेत, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेक लोकांनी मला या लग्नाविरोधात इशारा दिला. होता.
BJP Leader Daughter Wedding Muslim Youth Controversy