सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमरावती दंगल प्रकरणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना अटक

दंगल भडकवण्यास मुंबईतून पैसे आल्याचा नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2021 | 5:47 pm
in मुख्य बातमी
0
FEIskj3VIAMbIi9

मुंबई – त्रिपुरा मधील कथीत घटनेचे महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी तीव्र पडसाद उमटले, त्यातूनच अमरावती, नांदेड, मालेगाव सारख्या शहरांमध्ये दंगली सदृश्य घटना घडल्या. यात मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. अमरावतीची दंगल तर देशपातळीवर गाजली. त्यामुळेच तेथील इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली असून संचारबंदीही लागू आहे. अशा स्थितीतच या दंगलीचा कट रचल्याप्रकरणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमरावती दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मलिक यांनी आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, अमरावती दंगल ही खुद्द भाजप नेत्यांनीच घडवून आणली. इतकेच नव्हे तर भाजप नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा खळबळजनक दावा मलिक यांनी केला आहे.  भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केले, मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला. तसेच राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही, असेही मलिक म्हणाले.

भाजप नेते अनिल बोंडे यांनी २ तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचले होते. त्याकरिता दारुच्या बाटल्या वाटण्यात आल्या. पैसे वाटण्यात आले आणि दंगल भडकावण्यात आली. अशी पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आले. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

त्रिपुरातील घटनेनंतर मुस्लिम समाजात नाराजी होती. त्यामुळे मुस्लिम संघटनांकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी घटनेला नियंत्रित केले. ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. अशा सर्व संशयिताविरोधात गुन्हे दाखल करून अटक सुरू केली आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते काही खरे नाही. कारण कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत. त्यापैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे हे म्हणणे योग्य नाही, असे मलिक म्हणाले. दरम्यान, दंगल भडकविणे, दंगलीसाठी प्रवृत्त करणे यासंदर्भातील गुन्हे बोंडे यांच्या विरोधात लावण्यात आले आहेत. बघा, मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद

https://www.facebook.com/NawabMalikOfficial/videos/281109393948795/

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य सहाय्यकाला ग्रामस्थांची बेदम मारहाण (VDO)

Next Post

पंतप्रधान मोदींनी उदघाटन केलेले कमलापती रेल्वे स्टेशन आहे असे अत्याधुनिक (बघा फोटो)

Next Post
kamlapati7

पंतप्रधान मोदींनी उदघाटन केलेले कमलापती रेल्वे स्टेशन आहे असे अत्याधुनिक (बघा फोटो)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011