नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे हे १९ बंगल्यांचा हिशोब का देत नाही? १९ बंगले त्यांनी पत्नीच्या नावाने घेतले होते.
९ वर्षे त्यांनी या बंगल्यांची घरपट्टी भरली. परंतु इन्कम टॅक्स मध्ये हे बंगले दाखवले नाही. चोरी पकडली गेली तर बंगले गायब झाले.
*उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बायकोचे बंगले चोरीला गेले का? हे बंगले कुठे गेले? उद्धव ठाकरेंना हा हिशोब तर द्यावाच लागेल, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केले. ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोमय्या यांनी मुंबई महापालिका आयुक्तांवरही शरसंधान साधले. ते म्हणाले की, मुंबई महापालिका घोटाळ्यासंदर्भात मी कॅगची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील सांगितले आहे. मुंबई महापालिका आयुक्त हे ऑडिटला का घाबरतात? ऑडिट करावं लागणार आहे आणि ऑडिट होणारच. महापालिकेच्या शिपायाने कुटुंबाच्या नावाने बोगस कंपन्या काढल्या आणि त्यांच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेतलं. खासदार संजय राऊतांचे कौटुंबिक मित्र सुजित पाटकर यांनी बोगस कंपनी काढून १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. महापालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये. त्यांना एवढी भीती का वाटते? त्यांनी किती कोटीचा घोटाळा केला आहे? २ रुपयांच्या वस्तूचे २०० रुपये बिल दिले. कोविड काळातल्या ११ टेंडरमध्ये सर्व बोगस कंपन्या आहेत. आयुक्तांना निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवायचं की लाभार्थ्यांना, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला.
BJP Ex MP Kirit Somaiyya on Uddhav Thackeray Bungalow