मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपच्या कार्यालयावर काल सकाळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसह भाजपच्या शिष्टमंडळाने आज नाशिक पोलिस आयुक्त दिपक पांडे यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थितीत होते.