रविवार, नोव्हेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बिस्लेरी कंपनीची अशी आहे यशोगाथा; अशी झाली होती सुरुवात

ऑक्टोबर 12, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
C jSjomVwAAtq2j

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टाटा समूह लवकरच मिनरल वॉटरच्या व्यवसायात हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार करत आहे. भारतात बिस्लेरी इंटरनॅशनल ही कंपनी मिनरल वॉटरच्या व्यवसायात अग्रगण्य आहे. टाटा बिस्लेरी इंटरनॅशनलमधील रमेश चौहान यांचा स्टेक विकत घेऊन FMCG व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. टाटा समूह हळूहळू आपली हिस्सेदारी वाढ करेल, अशी माहिती समोर आली आहे.

टाटा या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खासगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत.
सुमारे ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे. बिस्लेरी, भारतातील बाटलीबंद पाण्याचा सर्वात लोकप्रिय ब्रँडच्या सध्या विक्रीची चर्चा सुरू आहे. टाटा समूहाने रमेश चौहान यांच्या नेतृत्वाखालील बिस्लेरी इंटरनॅशनल या भारतातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड वॉटर कंपनीमध्ये भागभांडवल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मिनरल वॉटर व्यतिरिक्त, बिसलेरी इंटरनॅशनल प्रीमियम हिमालयन स्प्रिंग वॉटर देखील विकते.

बिस्लेरी इंटरनॅशनलएक भारतीय कंपनी असून ती इ.स. १९८४ मध्ये जयंतीलाल चौहान यांनी स्थापन केली होती. ही कंपनी बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे. जे फेलिस बिस्लेरी यांनी १९६५ मध्ये सोडा ब्रँड म्हणून सादर केले होते आणि १९६९ मध्ये चौहान यांनी विकत घेतले होते. ही कंपनी सध्या बाटलीबंद पाणी आणि शीतपेये विकते.
बिस्लेरी ही मुळात फेलिस बिस्लेरी यांनी तयार केलेली एक इटालियन कंपनी होती. ही प्रारंभी एक फार्मास्युटिकल कंपनी होती, ती मलेरियाच्या औषधांची विक्री करत होती. याचे संस्थापक फेलिस बिसलेरी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची फॅमिली डॉक्टर रॉसीने बिसलेरीला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. जिने सर्वप्रथम भारतात बाटलीबंद पाणी विकण्याची कल्पना आणली होती. बिस्लेरी नंतर इ.स. १९६५ मध्ये सिल्चर, आसाम येथे काचेच्या बाटल्यांमध्ये दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली.

अधिकृत माहितीनुसार, बिस्लेरीकडे १२२ पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत. त्याचे संपूर्ण भारतात ५००० ट्रकसह ४५०० पेक्षा जास्त वितरक नेटवर्क आहे. देशातील पॅकेज्ड वॉटर मार्केटची किंमत २०,००० कोटींहून अधिक आहे. यातील ६० टक्के असंघटित आहेत. बिस्लेरीचा संघटित बाजारपेठेतील हिस्सा सुमारे ३२ टक्के आहे.
रमेश चौहान यांनी सन १९९३ मध्ये थम्स अप, लिम्का आणि गोल्ड स्पॉटसारखे प्रतिष्ठीत ब्रँड कोका कोलाला 60 मिलियनला विकले होते. थम्स अप देशातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड बनला आहे. बिसलेसीचे मालक रमेश चौहान यांच्या उत्तराधिकारी या कंपनीमध्ये हिस्सा कमी करण्याचे कारण आहे.

भारतात डॉक्टर रॉसी यांनी वकिल खुशरू संतकू यांच्यासोबत मिळून बिसलेरी लाँच केली. त्यावेळी बाटलीबंद पाणी विकणे हे काही कमी धाडसाचे नव्हते. बाटलीबंद पाणी विकत घेऊन कोण खरेदी करेल, अशी धारणा तेव्हा होती. परंतु त्यांनी भविष्याकडे पाहिले. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी ठाण्यात पहिला बिसलेरी वॉटर प्लांट सुरू केला.
भारतीय बाजारपेठेत बिसलेरीने मिनरल वॉटर आणि सोडा या प्रोडक्टसोबत एन्ट्री घेतली. त्यावेळी सामान्य व्यक्तीने बाटलीबंद पाणी विकत घेणे तसे अशक्य होते. परंतु श्रीमंतांमध्ये हे लोकप्रिय झालं. सुरूवातीला केवळ फाईव्ह स्टार हॉटेल आणि महागड्या रेस्तराँमध्ये बिसलेरीची बाटली उपलब्ध होती. परंतु त्यानंतर यात एक मोठा बदल घडला.

डॉ. रॉसी यांनी हा व्यवसाय पारले कंपनीच्या रमेश चौहान यांना विकला. १९६९ मध्ये बिसलेरी पारले कंपनीने विकत घेतला. एका रिपोर्ट्सनुसार हा व्यवसाय ४ लाख रूपयांमध्ये झाला. त्यानंतर चौहान यांना प्रत्येक घरापर्यंत बिसलेरी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वप्रथम बिसलेरी रेल्वे स्टेशनवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
आता एका रिपोर्ट्सनुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या घडामोडीबाबत माहिती दिली आहे. त्यापैकी एकाने सांगितले की टाटा समूहाने बिस्लेरीला भागभांडवल खरेदीसाठी ऑफर दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यास, टाटा समूहाला एंट्री-लेव्हल, मिड-सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर श्रेणींमध्ये येण्याची संधी मिळेल.

Bisleri Water Bottle Success Story
Industry

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला अर्ध्या रात्री राधिका आपटेने झोपेतून उठवले…

Next Post

सोलापूरमध्ये बदलतेय पीक पद्धती बदलतेय; याच्या लागवडीकडे कल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

सोलापूरमध्ये बदलतेय पीक पद्धती बदलतेय; याच्या लागवडीकडे कल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011