India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला अर्ध्या रात्री राधिका आपटेने झोपेतून उठवले…

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ नंतर ‘बस बाई बस’ हा महिलांसाठीचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. सुबोध भावे याचं खुसखुशीत सूत्रसंचालन करतात. त्यातून अनेक जुन्या गोष्टींना, किश्श्यांना उजाळा मिळून काही गुपित देखील बाहेर येत असतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली. मग धम्माल किस्से, धम्माल उत्तरं ऐकायला मिळाली. सुबोध भावेनं विचारलेल्या प्रश्नांना सोनालीनं धम्माल उत्तरं दिली.

तुझ्यासमोर इतर अभिनेत्रींचं कौतुक केलेलं आवडतं का? असा प्रश्न सुबोधने सोनालीला केला. यावर, हो… मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांचं कौतुकही मला आवडतं, असं सोनाली म्हणाली. याच कार्यक्रमात सोनालीनं बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिच्याबद्दलचा एक किस्साही ऐकवला. ती सांगते, ‘मी पुण्यात ‘रेस्टॉरंट’ चित्रपटाचं शूटींग करत होते. रात्रीचं शूटींग संपवून मी घरी आले आणि झोपी गेले. तासाभरात आईने मला उठवलं. तुझी मैत्रिण आलीये, असं ती म्हणाली. मी अर्धवट झोपेतून उठले आणि बघायला गेले तर दारात एक सुंदर, गोड मुलगी उभी होती. ती राधिका आपटे होती. मी तिला ओळखत नव्हते. तू कोण? असं मी तिला थेट विचारलं. यावर मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो, असं ती म्हणाली.

तेव्हा ती इंडस्ट्रीत नवी होती. तिला मुंबईत करिअर करायचं होतं आणि यासाठी तिला माझं मार्गदर्शन हवं होतं. त्याक्षणी राधिकाच्या धाडसाचं मला खरंच कौतुक वाटलं. आज ती जिथे आहे, त्याचा मला अभिमान आहे. यानंतर पुन्हा एकदा तिने माझं मार्गदर्शन घेण्यासाठी मला फोन केला होता. त्यामुळे मी माझी कॉलर ताठ करायला हवी नाही का? राधिका स्ट्रगलर असताना ती माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आली होती. असा किस्सा सोनालीने शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

Actress Sonali Kulkarni Actress Radhika Apte
Entertainment Bollywood Bus Bai Bus
Zee Marathi


Previous Post

शाहरुख खान करणार पुत्र आर्यनचे लॉन्चिंग; सध्या सुरू आहे या हालचाली

Next Post

बिस्लेरी कंपनीची अशी आहे यशोगाथा; अशी झाली होती सुरुवात

Next Post

बिस्लेरी कंपनीची अशी आहे यशोगाथा; अशी झाली होती सुरुवात

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group