इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती इलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची भारतात अधिक चर्चा होत आहे. केवळ चर्चाच नाही तर एलन मस्कची पूजा केली जात आहे. अगरबत्ती, धूप घेऊन इलन मस्कच्या होर्डिंग्जची आरती करत आहेत. भारतातील टेक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये हे सर्व घडत आहे.
सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (SIFF) तर्फे एलन मस्कच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे टेस्लाच्या सीईओसाठी या विशेष ‘पूजेचे’ आयोजन करण्यात आले होते.
https://twitter.com/SigmaINMatrix/status/1629894830737489921?s=20
सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (एसआयएफएफ) ही पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी एनजीओ आहे. एलन मस्कच्या पूजेबाबत या संस्थेचे म्हणणे आहे की, एसआयएफएफच्या पुरुष कार्यकर्त्यांना कंपनीच्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेकदा ट्विटरवरून बंदी घातली होती. ज्यांनी पुरुषांच्या हक्कासाठी आवाज उठवला, त्यांचे अकाऊंट सर्वप्रथम ट्विटरने बॅन केले. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर त्या लोकांना बाहेर काढले आणि आता आपल्या सर्वांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणूनच इलॉन मस्कची पूजा केली जात आहे.
इलन मस्कची पूजा करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्ते बॅनरसह दिसत आहेत ज्यावर लिहिलेले आहे की पुरुषांचे जीवन महत्त्वाचे आहे आणि पुरुषांना शांततापूर्ण अस्तित्वाचा अधिकार आहे. पूजकांनी इलन मस्कच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवली आणि एलन मस्काय नमः, एलन मस्क की जय… इलॉन मस्क, अदानी, अंबानी यांच्याकडून काहीतरी शिका. व्हिडिओ शेअर करताना, श्रीमन नरसिंग या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले हे की, ‘ट्विटर विकत घेण्यासाठी आणि पुरुषांना त्यांच्या छळाच्या विरोधात त्यांचे मत व्यक्त करण्यास परवानगी देण्यासाठी एसआयएफएफ सदस्य बंगळुरूमध्ये गुरु एलन मस्क यांची पूजा करत आहेत.’
https://twitter.com/realsiff/status/1630077806062485504?s=20
billionaire Elon Musk Hoarding Puja in Bengaluru