इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)चे पथक आज सकाळीच दाखल झाले आहे. राबडी या माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती आरोपी आहेत. टीम पोहोचली तेव्हा राबडी देवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या.
विधानपरिषदेचे सदस्य आणि त्यांचे जवळचे बंधू सुनील कुमार सिंहही तेथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्य तेजस्वी यादव यांच्यासह मंत्री आणि लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव हेही या निवासस्थानी उपस्थित आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून गेल्या महिन्यातच भारतात परतले आहेत.
सीबीआयचे पथक आल्याची माहिती मिळताच राबडी यांच्या निवासस्थानाबाहेर राजद समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. समर्थकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. मोदी सरकार हे लालू-तेजस्वींना घाबरले आहे, त्यामुळे सीबीआयची टीम इथे पाठवण्यात आली आहे, अशा घोषणा ते देत आहेत.
https://twitter.com/airnewsalerts/status/1632625091891585025?s=20
Bihar EX CM Rabari Devi Residence CBI Raid