पाटणा – बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात कुरघोडीच्या राजकारणाने अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजदचे आमदार आणि लालूंचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी विरोधी पक्षनेते आणि त्यांचे बंधू तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. लालू प्रसाद यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. संजय यादव यांनी तेजप्रताप यांच्या तीन सुरक्षारक्षकांचे मोबाईल बंद करून त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप तेजप्रताप यांनी या वेळी केला. तेजप्रताप यांचा हा आरोप तेजस्वी यांना घेरण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
राजद युवा प्रदेशाध्यक्ष आकाश यादव यांना पदावरून हटविण्यावरू तेजप्रसाद यादव नाराज आहेत. त्यावरून त्यांनी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह आणि संजय यादव यांच्यावर शाब्दिक वार केले आहेत. संजय यादव हे दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय यादव दिल्लीमध्ये मॉलचे बांधकाम करत असल्याचा आरोपही लावला आहे. तेजस्वी यादव के लहान मुलाची, जगदानंद सिंह यांना महाभारतातील शिशुपाल आणि संजय यादव यांना दुर्योधनाची उपमा दिली आहे. तेजप्रताप पुढे म्हणाले, की माझ्या तिन्ही सुरक्षारक्षकांचे मोबाईल बंद असून, संजय यादव यांनीच मोबाईल बंद केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवला धोका निर्माण झाला आहे. त्यापूर्वी तेजप्रताप यादव पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले. रक्षाबंधनासाठी बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी ते पाटण्याहून दिल्लीला जाताना त्यांचे सूर बदलल्याचे दिसत होते. बंधू तेजस्वी यादव दिल्लीला गेल्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे तेजप्रताप यांनी लहान भावाशी अतूट संबंध असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तेजप्रताप थोडे सौम्य झाल्याचे बोलले जात होते. लालू प्रसाद यांच्याकडे प्रकरण जाण्यापूर्वी प्रकरण थंड झाले. परंतु शनिवारी संजय यादव यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर प्रकरण शांत झाले नसल्याचे दिसत आहे.