नवी दिल्ली : भांडवलदार, साम्यवादी आणि जिहादींनी सोशल मीडिया मधील मूर्ख लोक आपल्या बाजूने वळवले आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा कंगना राणावत हिने केला आहे.
अनेक वेळा ट्विटरवरून आग पाखड करणारी कंगना आता फोटो अपलोड करणार्या साइट इन्स्टाग्रामवर भडकली आहे. सोशल मीडियाला कम्युनिस्ट आणि जिहादींचे गुरू म्हणत भाजपविरूद्ध द्वेष पसरवण्याचे माध्यम म्हणून वर्णन केले आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापरकर्त्यांच्या हुशारी आणि समजुतीवरही कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ट्विटरच्या धोरणांबद्दल कंगना अनेकदा ट्विट करत असते. मात्र इन्स्टाग्रामच्या बाबत तिने प्रथमच प्रश्न उपस्थित केला आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, इंस्टाग्राम मुर्ख लोकांसारखे असू शकते. येथे बुद्ध्यांकांची कमतरता आहे. आता विरोधी पक्ष या माध्यमाचा उपयोग स्वत: च्या मालमत्तेत वाढ करण्यासाठी करीत आहेत. हे लोक भाजपविरूद्ध द्वेष पसरवतात. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असेही कंगनाने म्हटले आहे. यापूर्वी कंगना तिच्या ऑक्सिजन ट्विटमुळे चर्चेत राहिली होती.
https://twitter.com/KanganaTeam/status/1386683624481775618?s=20