इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरलेला एमसी स्टॅन सध्या चांगलाच चर्चेत आहे. रॅपर म्हणून आधीच लोकप्रिय असलेल्या स्टॅनच्या लोकप्रियतेत या निकालानंतर चांगलीच वाढ झाली आहे. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर आता एमसी स्टॅन भारतभर फिरणार आहे. भारतातील विविध शहरांमध्ये एमसीचं कॉन्सर्ट असणार आहे. एमसीला लाइव्ह ऐकण्याची सुवर्णसंधी चाहत्यांना मिळणार आहे. मुळचा पुण्याचा असणाऱ्या एमसीच्या चाहत्यांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी देणार आहोत. पुण्यामध्ये एमसीचं लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे. ३ मार्चला हे कॉन्सर्ट असेल. पुण्यातील अमॅनोरा मॉल परिसरामध्ये एमसीचं हे कॉन्सर्ट असेल.
एमसीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याची माहिती दिली. एमसीच्या कॉन्सर्टची तिकिटे ‘बुक माय शो’ या ऍपवरून प्रेक्षकांना बुक करता येणार आहेत. या तिकिटांचे दर वेगवेगळे आहेत. ९९९ रुपयांपासून या तिकिटांच्या किंमतीला सुरुवात होते. एमसीचा शो अगदी जवळून पाहायचा असेल तर त्यासाठी ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर फॅन झोन विभागातील तिकीटांची किंमत २४९९ रुपये इतकी आहे. एमसीच्या कॉन्सर्टची काही तिकिटं विकली गेली आहेत. चाहते त्याला प्रत्यक्षात ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्याचं हे कॉन्सर्ट दोन तास असणार आहे. एमसी पुण्याच्या एका लहान वस्तीमध्येच लहानाचा मोठा झाला. ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CouquhDN-JZ/?utm_source=ig_web_copy_link
Big Boss Winner MC Stan Concert in Pune Details