इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस’च्या सोळाव्या पर्वाचा नुकताच धक्कादायक निकाल लागला. आणि रॅपर एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता ठरला. खरं तर स्टॅन या शर्यतीत कुठेच नव्हता. उलट शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी हे दोघे यंदाच्या पर्वाचे विजेते ठरतील असा अंदाज होता. पण, हे सगळे अंदाज चुकवत स्टॅन याने विजेतेपद पटकावले आहे.
एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’चे १६वे पर्व जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी यंदाच्या पर्वाचे विजेते ठरतील, अशी चर्चा असतानाच एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली. बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणेकर असलेल्या अवघ्या २३ वर्षीय एमसी स्टॅनचा रॅपर ते बिग बॉस विजेता हा प्रवास काही सोपा नव्हता. केवळ २३ व्या वर्षी तो तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो आहे. एमसी स्टॅनची एकूण संपत्ती सुमारे ५० लाख आहे. त्याची गाणी आणि यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ तडवी आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. लहान वयातच त्याला कव्वाली आवडायला लागली. आणि त्यांनी ती आत्मसात करण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबत त्याने परफॉर्म केलं आहे. यूट्युबवर जवळपास २१ मिलियन व्ह्यूज असलेल्या ‘वाटा’ या गाण्याने स्टॅनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. एमसी स्टॅनला भारताचा टुपॅक म्हटलं जातं.
https://twitter.com/ItsTeamMCStan/status/1624853665688485888?s=20&t=-DoEqovjso777vysOIFMLQ
हिप-हॉप इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून स्टॅनची ओळख आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग करत असे. तो ‘बिग बॉस १६’ च्या प्रीमियरला ६०-७० लाख रुपयांचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि ८० हजारांचे शूज घालून आला होता. गेल्या तीन-चार वर्षांत त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. एमसीचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. अभ्यासापेक्षा गाणे आणि रॅपकडे त्याचे जास्त लक्ष असल्याने त्याला सगळ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागत होते. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण त्याने हार न मानता संघर्ष करत आजचे स्थान पटकावले आहे.
एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल भाष्य केलं होतं.
https://twitter.com/ColorsTV/status/1624846123071582208?s=20&t=-DoEqovjso777vysOIFMLQ
Big Boss 16 Winner MC Stan Life Journey