India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजपच्या आक्रमकतेमुळे शिंदे पुत्र खुद्द श्रीकांतच अडचणीत? शिंदे गटात खळबळ

India Darpan by India Darpan
February 13, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण येथे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे दौरे वाढल्याने शिंदे गटात खळबळ माजली आहे. सध्या भाजप आणि शिंदे गट यांचे सरकार राज्यात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले भाजता नेत्यांचे दौरे नवीन समीकरण उदयास आणणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याची माहिती देताना भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले,‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभेचा दुसऱ्यांदा दौरा होत आहे. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांचा एकदिवसीय दौरा आहे. मागील वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता.

१४ फेब्रुवारी रोजी अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत.’

१८ मतदारसंघांवर भाजपाचे लक्ष
भाजपाने महाराष्ट्रातील जे १८ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. ते मतदारसंघ अधिक सक्षम करणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे, हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात भाजपा मजबूत आहेच. पण लोकसभेत अधिक यश मिळावं, त्याअनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघ बळकट करण्याचं काम आम्ही करत आहोत, असे आमदार केळकर म्हणाले.

Politics BJP Strategy MP Shrikant Shinde Trouble


Previous Post

बिग बॉस १६चा विजेता एम सी स्टॅन आहे तरी कोण? अशी आहे त्याची आजवरची कारकीर्द… (Video)

Next Post

मास्क घालून ४ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण केले…. पेटीएम नंबरमुळे असा आला पोलिसांच्या जाळ्यात…

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मास्क घालून ४ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण केले.... पेटीएम नंबरमुळे असा आला पोलिसांच्या जाळ्यात...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group