भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रेल्वे कर्मचाऱ्याने कौटुंबिक कलहातून पत्नीसह वृद्ध आईचा खून करुन मेव्हण्यावर वार केला आहे. पत्नी आवडत नाही म्हणून हा वाद सुरु होता. त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी पहाटे पत्नी आणि आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत या दोघांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर संशयित हेमंत भूषण श्रवणकुमार (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये ही घटना घडली आहे. मयत पत्नीचे नाव आराध्या हेमंत भूषण तर आईचे नाव सुशीलादेवी भूषण असे आहे. या घटनेत शालक रिषब जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे होते वादाचे कारण
संशयित हेमंत याचे आराध्या सोबत हेमंत २ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाले होते. पण, हेमंतला आराध्या आवडत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु होते. या वादातून ही घटना घडली. हा वाद मिटवण्यासाठी शालक रिषभ हा भुसावळला आला होता. पण, त्याच्यावरही वार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले.
Bhusawal Husband Wife Dispute Crime