शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची पुण्यात भिडेवाडा आणि फुलेवाड्याला भेट… विस्तरिकरणाच्या कामांचा घेतला आढावा

by India Darpan
जानेवारी 30, 2025 | 4:30 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250130 WA0288 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामात कुठे अडचणी येऊ देणार नाही आणि अडचणी आल्याच तर मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुणे येथे केले. पुणे दौऱ्यावर असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भिडेवाडा येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या आणि फुलेवाडा येथील स्मारकाच्या विस्तारिकरणाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, भिडे वाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. याठिकाणी स्मारक होण्यासाठी अनेक वर्ष गेली. मात्र मोठा संघर्ष उभा करून आम्ही ही लढाई जिंकली आणि त्या ठिकाणी आता स्मारक उभे राहत आहे. या स्मारकाच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी आणि याच्या कामाची माहिती घेण्यासाठी आज पुण्यात आलो असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, फुले वाड्याचा देखील आपण विस्तार करत आहोत महात्मा फुले राहत असलेला वाडा आणि सावित्रीबाईंचे तयार केलेले स्मारक एकत्र करून त्या ठिकाणी आपण भव्य स्मारक तयार करणार आहोत. यासाठी तिथे असलेले काही रहिवाशी आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहोत. या ठिकाणी ५१६ मालक २०० भाडेकरू असल्याची माहिती आहे. मात्र त्यांचे योग्य ते पुनर्वसन करूनच हा प्रश्न मार्गी लावणार आहोत. विस्तारीकरणासाठी सरकारने दोन दिवसापूर्वीच निधी जाहीर केला आहे. या कामाला गती मिळाली असून या कामाचा देखील सतत आम्ही पाठपुरावा करतच राहू असेही ते म्हणाले.

यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, स्थानिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून आपण विस्तारीकरण करणार आहोत. महापालिकेच्या वतीने स्थानिकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासने हे लवकरच सर्वांशी चर्चा करून यामध्ये तोडगा काढतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

फुले वाड्याच्या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्थानिकांशी संवाद साधून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून आपण फुले वाड्याचे विस्तारीकरण करू असे मत यावेळी आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केले. यावेळी दोन्ही कामे विहित वेळेत पूर्ण करावे असे आदेश देखील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख त्याचप्रमाणे समता परिषदेचे अविनाश चौरे, प्रितेश गवळी, सागर दरवडे, सपना माळी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार…गुन्हा दाखल

Next Post

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Next Post
WhatsApp Image 2025 01 30 at 17.14.19

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी...केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011