नाशिक – जिल्ह्यातील तूर्त निर्बंध वाढ किंवा कमी न करण्याचे निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. निर्बंध तेच कायम राहतील अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोना संबधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तिस-या लाटेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता दुस-या लाटेमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. दुस-या लाटेत ४८ हजार रुग्ण झाले होते. आता ८ जुलै रोजी १ हजार ७८७ रुग्ण आहे.
यावेळी त्यांनी म्युकर मायकॉसिसबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले की, आता १०४ रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत ७०७ बाधित रुग्ण होते. त्यापैकी ४३५ रुग्णांवर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. ७०७ मध्ये ७० मृत्यू झाले असून त्याचे प्रमाण १० टक्के आहे. लसीकरणाबाबत माहिती देतांना ते म्हणाले की, जिल्ह्यात १२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. ३ लाख १८ हजार लोकांना दुसरा डोस दिलेला आहे. तर खासगी रुग्णालयात ६० हजार लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी लसीचा पुरवठा पुरेसा नाही. एकाच दिवसात एक लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नाशिक शहरात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण, ग्रामीण भागात थोडी वाढ झाली आहे. लग्न, गर्दी करणे व मास्क न वापरणे ही कारणे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लग्न सोहळ्याला परवाणगी देतांना त्यांना थर्मल गण, सॅनेटाइझर व मास्कचा वापर बंधनकारक करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी राजकीय आंदोलन करणा-यांनी सुध्दा सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाऊस लांबणीवर पडत असल्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. औद्योगिक कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडाचा वापर पुढील काळात कोरोना उपचारासाठी करावा असे आवाहनी त्यांनी केले. याबाबत अधिकारी कंपन्यांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.