सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता? BHR घोटाळ्याच्या आरोपीने ६४ ठेवीदारांच्या घरी जाऊन दिले १ कोटी १२ लाख

by India Darpan
जुलै 9, 2021 | 7:21 am
in मुख्य बातमी
0
bhr 1

विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – देशाच्या कोणत्याच आर्थिक घोटाळयात आजतागायत घडली नव्हती. अशी एक अभूतपूर्व घटना बीएचआर घोटाळ्यात घडली आहे.  चक्क एका संशयित आरोपीने अटकेच्या भीतीपोटी थोडथोडके नव्हे, तर चक्क १ कोटी १२ लाख रुपये ६४ ठेवीदारांना घरी जाऊन परत केले आहेत. यातील बहुतांश ठेवीदारांनी पुणे आर्थिक शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडमांचे आभार मानले आहेत. तसेच नवटके मॅडमांच्या कारवाईच्या भीतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, या घोटाळ्यातील संशयितांनी अटकेपूर्वी ठेवीदारांचे पैसे परत केल्यास कदाचित त्यांना दिलासा मिळू शकतो. तर दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. थोडक्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईच्या भीतीमुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळायला आता जोरात सुरुवात झाली आहे.
देशात आजपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत. बँक, पतसंस्था बुडाल्या की, ठेवीदारांना आपल्या कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक वर्ष कोर्टात केसेस चालतात. अगदी निकाल लागल्यानंतरही पैसा मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. अनेकांचे शैक्षणिक नुकसान होते. तर अनेक मुलींचे लग्नही होऊ शकलेले नाहीत. थोडक्यात एकदा बुडालेला पैसा परत मिळणे कठीणच असते. परंतू बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके मॅडमांनी मागील वर्षापासून अनेक बड्या लोकांना बेड्या घातल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी राज्यातील विविध शहरातून ११ लोकांना अटक केली होती. तेव्हापासूनच या अटकसत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरलेली आहे. याचाच परिपाक म्हणून आज बीएचआर घोटाळ्यात  पैसे परत करण्यासारखी अभूतपूर्व घटना घडली.
निमगाव-केतकी येथील ठेवीदारांमध्ये आनंदाची लहर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव-केतकी येथील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने ६४ ठेवीदारांचे ५० लाख रुपये चक्क घरी जाऊन परत दिले आहेत. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ठेवीदार हे शेतकरी आहेत. कापसे याने ४० टक्के रक्कम देऊन ठेवीदारांकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतले होते. परंतू पुणे आर्थिक गुन्हे शाखेने निमगाव-केतकी येथील ठेवीदारांचे जबाब घेतले होते. त्यानुसार त्यांना फक्त ४० टक्के रक्कम मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कापसेला अटक करण्याची तयारी सुरु केली होती. परंतू अटकेच्या भीतीनेच कापसे याने मागील दोन दिवसात ६४ ठेवीदारांन घरी जाऊन उर्वरित ६० टक्के रक्कम देखील परत केली आहे. कापसेने आतापर्यंत तब्बल १ कोटी १२ लाखाची रक्कम परत केली आहे. तसेच पुढील काही दिवसात तो आणखी काही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे कळते.
दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. बीएचआर घोटाळा प्रकरणात कर्जदार तथा संशयित आरोपी अंबादास मानकापे व आसिफ तेली या दोघांनी कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नुकताच पुण्याच्या विशेष न्यायालयात अर्ज सादर केले होते. यापूर्वी भागवत भंगाळे यांनी देखील अशाच पद्धतीने पैसे भरायची तयारी दर्शवली आहे.
…म्हणूनच अभूतपूर्व घटना ! 
आर्थिक घोटाळ्यांमध्ये गुन्हे दाखल होतात. आरोपींना अटक केली जाते. अनेकांना शिक्षा होते. परंतू ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही. ‘सहकारातून समृद्धीकडे’, विना सहकार नाही उद्धार….सहकारी संस्थांचे हे ब्रीद वाक्य खरं तर लोकांसाठी आहे. परंतू गेल्या काही वर्षांत संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे अनेक पतसंस्था आर्थिक नुकसानीत गेल्याची काही उदाहरणे पुढे आली. त्यामध्ये ठेवीदारांचे अधिक नुकसान झाले आहे आणि सरकारला फारशी मदत करता आलेली नाही, हे देखील एक सत्य आहे. म्हणूनच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईच्या भीतीपोटी एकाच वेळी १ कोटी १२ लाखाची रक्कम ठेवीदारांना परत मिळाल्यामुळे ही घटना अभूतपूर्व अशीच मानली जात आहे. त्यामुळेच उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि त्यांचे तपासधिकारी सुचेता खोकले, पोलीस निरीक्षक संदीप भोसलेंसह आर्थिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे ठेवीदार आभार मानत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खडसे आणखी अडचणीत; पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीचे समन्स

Next Post

पालकमंत्री भुजबळांनी आढावा बैठकीनंतर दिली ही माहिती

Next Post
chhagan bhujbal1

पालकमंत्री भुजबळांनी आढावा बैठकीनंतर दिली ही माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011