शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भोसला सैनिके शाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे केले कौतुक….

by India Darpan
एप्रिल 1, 2025 | 6:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
bhosala

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलासाठी उत्कृष्ट अधिकारी तसेच आधुनिकतेला स्विकारणारे व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे काम होत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व जनरल बिपीन रावत यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास सेवानिवृत्त जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे सेवानिवृत्त एयर चिफ मार्शल शिरीष देव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, संस्थेचे कुमार काळे, दिलीप चव्हाण, राहूल दिक्षीत, हेमंत देशपांडे, विवेक रानडे, संजय जोशी, अमरेंद्र हरदास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
समाजामध्ये सैनिकी मुल्यांचे रोपण व सैन्याचे भारतीयीकरण तसेच त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसला सैनिकी शाळेची स्थापना झाली. आधुनिकतेला स्वीकारणारी पिढी निर्माण करण्याचे काम संस्‍थेच्या माध्यमातून होत आहे. अनुशासित भारत घडविण्याच्या कार्यासोबतच सैन्यदलाला आधुनिकतेकडे घेवून जाणारे सैन्यदल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी. संपूर्ण भारतीयांना मेजर बिपीन रावत यांच्या कार्याची व आदर्शांची कायम आठवण रहावी, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र देशात तयार होत आहेत व आपण या शस्त्रांची निर्यातही करत आहोत. भारताने नेहमी शांतीसाठी कार्य केले असल्यामुळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

एयर मार्शल शिरीष देव यांनी भोसला सैनिकी शाळा ही एनडीए च्या धर्तीवर विकसित होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सैनिकी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा तसेच सैनिकी शिक्षणाबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी सैन्य दल प्रमुख मनोज पांडे म्हणाले, जनरल बिपीन रावत हे देशासाठी अलौकीक कार्य करणारे व विकसित
भारतामध्ये सशस्त्र दलाला आधुनिकतेकडे नेणारे दूरदर्शी नेतृत्व होते. तिन्ही दलाला एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासोबतच युद्धासाठी कायम सज्जता असावी अशा विचारांचे असल्यामुळे भारतीय सैन्य दलात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी स्वागत करून संस्थेमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले. सैनिकी शिक्षणाची सुरूवात करणारे संस्थेचे संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण ही संस्थेसाठी महत्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रख्यात शिल्पकार प्रदिप शिंदे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षला राजगिरे यांनी केले. तर राहूल दीक्षीत यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना नवीन कार्यामध्ये यश मिळेल, जाणून घ्या, मंगळवार, १ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

Next Post
WhatsApp Image 2025 03 31 at 8.32.33 PM 1024x806 1

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011