इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिन्याचा ३० हजार रुपये पगार आणि घरी आढळले सात कोटी, असे वाचून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, असे प्रत्यक्षात भोपाळ येथे घडले आहे.
भोपाळमधील लोकायुक्त पथकाने केलेल्या धाड कारवाईतून एक मोठे घबाड पुढे आले आहे. पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्चपदावरील महिला ही असिस्टंट इंजिनीअर आहे. तिच्या फार्म हाऊसवर लोकायुक्त पथकाने धाड टाकली. यावेळी महिला इंजिनिअरकडे तब्बल ७ कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे उघड झाले. सध्या महिलेच्या घरी सापडलेल्या संपत्तीचा आढावा घेतला जात आहे.
जेव्हा लोकायुक्तच्या पथकाने महिला इंजिनिअरच्या घरी छापेमारी केली, तेव्हा ३० हजार पगार असलेल्या या अधिकाऱ्याची संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईल पाहून तपास यंत्रणेतील अधिकाही हैराण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरच्या फार्म हाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आला होता. त्यात महागडी दारूसह सिगारेट उपलब्ध होत्या. महाग कार, २ ट्रक आणि महिंद्रा थारसह एकूण १० वाहने जप्त करण्यात आली.
इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता. हेमा मीणा या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. इंजिनिअर हेमा मीणा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्त पथकाने ही कारवाई केली.
पशुसंवर्धन विभागाला पाचारण
जेव्हा हेमा मीणाच्या उत्पन्नासह तिच्या मालमत्तेचे विश्लेषण केले गेले तेव्हा तिची मालमत्ता ३३२ टक्के जास्त असल्याचे आढळून आले. सध्या तीन ठिकाणी शोध घेतला जात आहे. आता मिळणाऱ्या गोष्टींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक बोलावण्यात आले असून, ते इमारतीचे मूल्यांकन करणार आहेत. यासोबतच पशुसंवर्धन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
https://twitter.com/psamachar1/status/1656997153917599744?s=20
Bhopal Lokayut Raid Engineer Hema meena