India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निलंबित आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकार मेहेरबान… काढले हे मोठे आदेश…

India Darpan by India Darpan
May 12, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ठाकरे सरकारने केलेले त्यांचे निलंबन विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. सरकारने यासंदर्भातील आदेश आज काढले आहेत.

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. यानंतर परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले होते. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर आता परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

२ डिसेंबर २०२१ रोजीचे आरोपपत्र अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६९ च्या नियम ८ अंतर्गत परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले जात आहे. हे प्रकरण बंद केले जात आहे, असे सरकारचे संयुक्त सचिव व्यंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. याशिवाय, नियमांच्या तरतुदींनुसार, परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्यात येत असून, ०२ डिसेंबर २०२१ ते ३० जून २०२२ पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी सर्व उद्देशांसाठी कर्तव्यावर असल्याचे मानले जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. याचाच अर्थ सदर काळ सेवा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

नागपूरशी नाते, मविआला आणले होते अडचणीत
परमबीर सिंह यांचे नागपूरशी जवळचे नाते आहेत. ते माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपूत्र सागर मेघे यांचे व्याही आहेत. दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणले होते. अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना परमबीर सिंह यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अनेक महिने ते अज्ञातवासात होते.

Shinde Fadnavis Government IPS Parambir Singh Order


Previous Post

शिंदे सरकार वाचले पण टांगती तलवार कायम.. आता ही आहे खरी गोम… यावरुन होणार प्रचंड वादंग

Next Post

काही वर्षेच नोकरी… अवघे काही हजार पगार… घरात आढळले कोट्यवधी रुपये… लोकायुक्त पथकाची इंजिनीअरवर मोठी कारवाई

Next Post

काही वर्षेच नोकरी... अवघे काही हजार पगार... घरात आढळले कोट्यवधी रुपये... लोकायुक्त पथकाची इंजिनीअरवर मोठी कारवाई

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group