इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडिया दर्पणमध्ये दररोज लाखोच्या संख्येने वाचक राशिभविष्य वाचत असतात. या सर्व वाचकांना आता ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे राशिभविष्य सांगणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
Bhavishya Darpan New Horoscope Jyotishacharya Column
Prashant Chaudhari