नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आलेली आहे. आता ही यात्रा वाशिम जिल्ह्यात जात आहे, मात्र भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. पण या मुलांनी आजवर कधी कॉम्प्युटर पाहिला नाही तसेच त्यांच्या शाळेतही कॉम्प्युटर नसल्याचे सांगितले.
शाळेतच कॉम्प्युटर नसेल तर ही मुले आपले स्वतःचे स्वप्न कसे पूर्ण करणार अशी शंका घेत घेत राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यातील दोन मुलांना लॅपटॉप भेट दिला. यामुळे या मुलांच्या स्वप्नाला आता बळ मिळाले आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ही तर दोन मुलांची गोष्ट झाली, परंतु आपले हिंदुस्तानातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न आहे. या घटनेत राहुल गांधींनी चिमुकल्यासोबत साधलेल्या संवादाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे
या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दोन मुलांबद्दल दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल गांधींनी नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलास लॅपटॉप भेट दिला आहे. यावेळी सर्वेश देखील यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींनी सर्वेशला विचारले तुला मोठे होऊन काय बनायचे आहे. तेव्हा सर्वेशने मला सॉफ्टवेअर इंजिनीअर बनायचे, असे सांगितलं. सर्वेशने कॉम्प्युटर पाहीला नाही असे उत्तर दिले, यावेळी राहुल गांधी यांनी संवदेनशीलता दाखवत या मुलाला लॅपटॉप भेट दिला.
सर्वेश हाटणे याने लॅपटॉप मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की , पहाटे साडेचार वाजता उठलो. अंघोळ वगैरी केली. आमच्या गावातले सुनील टेम्पोवाले यांनी आम्हाला इथे आणले. त्याची आम्हाला खुशी वाटली. सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आम्हाला मर्ज कसे करायचे, यूट्यूब कसे चालवायचे हे समजावून सांगितले. लॅपटॉप दिला.
तसेच चंद्रकांत किरकन या मुलांना भेटून त्यांचा प्रश्न जाणून घेतला होता. त्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने तोही लॅपटॉप घेऊ शकत नाहीत. तसेच शाळेत संगणकही नसल्याचे सांगितल्यानंतर काल सर्वेश हातनेला आणि आज चंद्रकांत किरकन या दहावीतल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींकडून लॅपटॉप देण्यात आला आहे.
हे दोघेही लोहा तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी असून दहावीत शिकत आहेत. राहुल गांधी यांच्या या भेटीबद्दल सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे तसेच त्यांच्या पदयात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे आता ही पदयात्रा बाळापुर मार्गे वाशिम जिल्हयात येत आहे. तसेच ही यात्रा शेगाव बाळापुर रोडवरील वरखेड फाट्याजवळ दुपारच्या विश्रांतीसाठी थांबणार असून तेथून ते शेगाव शहरात दाखल होणार आहेत. खासदार राहुल गांधी यांची दि. १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
https://twitter.com/bharatjodo/status/1590918419846959105?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Gift Laptop 2 Students
Congress Education