मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.
https://twitter.com/maha_governor/status/1626529349112578048?s=20
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/mieknathshinde/status/1626452926838484992?s=20
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.
Bhagatsingh Koshyari Left Maharashtra Before that