मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे राज्यपाल पदाचा राजीनामा देणार आहेत. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तशी माहिती खुद्द कोश्यारी यांनीच दिली आहे. कोश्यारी हे त्यांच्या विविध विधाने आणि वादग्रस्त वक्तव्यांवरुन नेहमीच चर्चेत राहिले आहेत. तसेच, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे यासाठी विरोधकांनी जोरदार मागणी आणि आंदोलनही केले होते.
कोश्यारी यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/maha_governor/status/1617466688286650368?s=20&t=Z0sotfwkOj1XQQSvs64bkw
Bhagat Singh Koshyari Governor Post PM Letter