India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर यांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान; पुरात जीव धोक्यात घालून असे वाचवले प्राण

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड जिल्ह्यातील रोहन बहीर ने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळयात राष्ट्रपती, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी, केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, सचिव इंदिवर पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी देशभरातील 11 बालकांना सहा विविध श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेख‍नीय कामगिरीसाठी ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. राज्यामधून बीड जिल्ह्यातील रोहन बहीर या बालकाला त्याने केलेल्या शौर्यासाठी आज गौरविण्यात आले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे स्वरूप पदक, 1 लाख रूपये रोख आणि प्रमाण पत्र असे आहे.

रोहनने असे वाचविले प्राण
बीड जिल्ह्यातील राजुरी नवगण येथील रोहन बहीर याने गावातील डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठया साहसाने वाचविले. रोहनच्या समय सूचकतेमुळे महिलेचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्यासाठी आज त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम (Innovation), शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळाली. अशा 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची निवड करण्यात आली होती.
यावर्षी देशभरातून निवडलेल्या 11 मुला-मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोपक्रम (2), समाजसेवा (2) अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

Beed District Rohan Bahir Bal Shaurya Puraskar


Previous Post

शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे दोन्ही आले समोरासमोर… मग काय घडलं?

Next Post

अभिनेता सुनिल शेट्टीच्या कन्येचा धुमधडाक्यात विवाह सोहळा; हा आहे त्याचा जावई

Next Post

अभिनेता सुनिल शेट्टीच्या कन्येचा धुमधडाक्यात विवाह सोहळा; हा आहे त्याचा जावई

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group