इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील लोकसभेत बारामती निवडणूक चांगलीच गाजली होती. पवार विरुध्द पवार निवडणुकीत नणंद आणि भावजयीमध्ये लढत झाली आहे. आता मात्र विधानसभेत भाऊ विरुध्द भाऊ व काका विरुध्द पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार आणि अजित पवार गटाकडून जय पवार एकमेकांविरुध्द निवडणूक लढवू शकतात. तर जामखेडमधून रोहित पवार विरुध्द अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे.
या चर्चेचे कारण अजित पवार यांचे हे एक वक्तव्य ठरले आहे. त्यांनी बारामतीतून ब-याच वेळा लढल्यामुळे आता रस नाही असे म्हटल्यानंतर या शक्यतेची चर्चा सुरु झाली आहे.