नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात बँकेचे कामकाज बहुतांशपणे ऑनलाईन पद्धतीने झाले तरी ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक सर्वसामान्य ग्राहक प्रत्यक्षपणे बँकेत जाऊनच व्यवहार करतात. परंतु पुढील महिन्यात बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसी लाक्षणिक संप असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गैरसोय होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात बँक संघटनांनी पुन्हा एकदा देशव्यापी बंदची हाकाटी दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी बँक संघटना सरकारच्या धोरणांविरोधात एक दिवसाचा लक्षणिक संप करणार आहे. त्यादिवशी बँकांचे कामकाज ठप्प होईल. सरकारी सुट्टया आणि राष्ट्रीय सुट्ट्या या दोन श्रेणी बँकांच्या सुट्ट्या असतात. तसेच भारतात तीन राष्ट्रीय सुट्ट्या आहेत. यावर्षी जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत बँकांना सुमारे शंभर पेक्षा जास्त सुट्ट्या होत्या, यामध्ये शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. तरीही बँक कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपर्क करतात, त्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प होते.
कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी एआयबीईए (AIBEA) या संघटनांचे देशभरातील पाच लाखावर सभासद कर्मचारी तसेचअधिकारी दोन दिवसांच्या संपात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सात हजार शाखांतून काम करणारे जवळजवळ तीस हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी या संपात सहभागी होणार असून मुंबईसह राज्याची बँकिंग व्यवस्था ठप्प होणार आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात कर्मचारी तसेच अधिकारी यांचा सहभाग आहे. नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने एक दिवसाचा बँक संपाची हाक दिली आहे. एक दिवसांसाठी बंद राहतील. याविषयीची माहिती भारतीय बँक कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बँकेची मालमत्ता आणि बँकर्सवर सध्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या हल्ल्यांमागे सुसूत्रता समोर आली आहे. पण दोषींविरोधात अद्यापही ठोस कारवाई झाल्याचे मात्र सिद्ध झालेले नाही. त्याविरोधात बँक कर्मचारी एक दिवसांचा देशव्यापी संप करणार आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यांमागे काही जणांचा हात असून बँकर्सवर हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.
इतकेच नाही तर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांना बँकांनी जाणून बुजून कामावरुन कमी केले आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा व आयडीबीआय बँक यामध्ये आऊट सोर्सिंग वाढली आहे. काही बँकामध्ये तर अक्षरशः जंगल राज सुरु आहे. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक सर्वात अगोदर येतो. या बँकेत ३३०० कर्मचाऱ्यांची बेकायदा बदली करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.