पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दागिने किंवा अन्य मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँक लॉकरची सुविधा वापरतात. मात्र, बँक लॉकर संदर्भातील अनेक नियम ग्राहकांना माहित नसतात. लॉकर फोडून चोरी झाली तर त्याची जबाबदारी कुणाची, ग्राहकाला भरपाई मिळते का, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. आज त्याविषयी आपण जाणून घेऊया..
सर्वोच्च न्यायालयाने बँक लॉकर संदर्भात एक मोठा निकाल दिला आहे. पीडित ग्राहकाला ३० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला देण्यात आले आहेत. सदर प्रकरण झारखंडमधील बोकारो स्टील शाखेशी संबंधित आहे. गोपाल प्रसाद नावाच्या व्यक्तीचे लॉकरमध्ये ठेवलेले सर्व दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी तब्बल पाच वर्ष कायदेशीर लढाई दिल्यानंतर गोपाल यांना न्याय मिळाला. बँक लॉकरमधून दागीने चोरी होण्याची ही घटना पहिली नाही. लॉकर तोडून चोरी होणे, सामान गायब होणे अशा घटना वारंवार आपल्या कानी येत असतात. परंतु अनेक वेळा बँक अशा घटना झाल्याचे नाकारतात.
लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाची जबाबदारी बँकेची नाही असे सांगण्यात येते.हेच गोपाल यांनाही सांगण्यात आले होते. लॉकरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे बँकेला माहीत नसल्याने बँक ही जबाबदारी घेण्यास नाकारते. त्यामुळे ग्राहकांजवळ फक्त कायदेशीर लढाई लढण्याचा पर्याय राहतो. परंतु आता बँका अशा चोरीच्या घटना घडल्यास जबाबदारी झटकू शकत नाहीत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर RBI ने नवीन नियम जानेवारी 2022 पासून जारी केले आहेत.
या नियमांनुसार आग लागणे, चोरी होणे, इमारत जळाल्यास किंवा कर्मचाऱ्यांनी घातपात केल्यास बँकेला लॉकरच्या वार्षिक शुल्काच्या 100 पट अधिक नुकसान भरून द्यावे लागणार आहे. RBI ने लॉकर व्यवस्थापनाबाबत देखील नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम लॉकर आणि बँकांजवळ असणाऱ्या वस्तूंची सेफ कस्टडी या दोन्हीवर लागू होतात. परंतु असे असतानादेखील लॉकरमधून सामान चोरी झाल्यास जबाबदारी घेण्यास कोणीही तयार होत नाही. कायदेशीर खर्च परवडत नसल्यानं अनेकजण न्यायालयात दाद मागत नाहीत. बँकांनी आपल्या लॉकरची सुरक्षा करणं गरजेचं आहे असे RBI नं स्पष्ट केलंय. बँकांच्या लॉकरचे स्ट्रॉंग रूम RBI च्या दिशानिर्देशानुसार तयार करण्यात येते.
तसेच काही जण सोन्या-चांदीत गुंतवणूक करतात. परंतु मौल्यवान वस्तू चोरीच्या भीतीनं घरात ठेवता येत नाहीत. अशा वेळी आपल्याकडे बँकेचा लॉकर हा पर्याय असतो. बँकेच्या लॉकरमध्येसुद्धा या अमूल्य वस्तू सुरक्षित राहिल्या नाहीत, तर आपल्याला त्याची भरपाई मिळते का, रिझर्व्ह बँकेचे (RBI) काय नियम आहेत, याविषयी माहिती घेऊ या. लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम तयार केले आहेत. यामध्ये टर्म डिपॉझिटचा समावेश आहे. जेव्हा नवा ग्राहक मौल्यवान वस्तू ठेवण्यास बँकेत येईल, तेव्हा बँक त्याच्याकडून तीन वर्षांची लॉकर फी डिपॉझिट म्हणून घेते. तसंच लॉकरसेवा काढून घेण्याची फीदेखील त्याच वेळी घेतली जाते.
रिझर्व्ह बँकेने (RBI) नियम बदलले आणि भरपाई निश्चित केली. लॉकरमधून सामान चोरी झाल्यास, आग लागल्यास आणि आर्थिक घोटाळा झाल्यास लॉकरच्या वार्षिक फीच्या 100 पट भरपाई द्यावी, असा नियम केला. आरबीआयनं निश्चित केलेला हाच नियम सध्या लागू आहे. उदाहरण घ्यायचं झालं, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी तुम्ही बँकेला वर्षाला 1 हजार रुपये फी देत असाल आणि बँकेत चोरी झाली किंवा दरोडा पडला, तर तुम्हाला 1 हजार रुपयांच्या 100 पट म्हणजेच 1 लाख रुपये मिळू शकतात.
आग लागणं, चोरी होणं, फसवणूक होणं, इमारत कोसळणं, बँक कर्मचाऱ्यानं घोटाळा करणं या परिस्थितीतही क्लेम केल्यास तुम्हाला बँकेकडून भरपाई मिळू शकते. आता अशा काही घटना घडल्यास 100 पटीनं भरपाई मिळण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. पूर्वी असं काही अघटित घडलं तर ग्राहकांना असा कोणताच अधिकार मिळाला नव्हता. ग्राहकांच्या वस्तूंचं नुकसान झाल्यास बँका हात वर करू शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पुढाकार घेऊन हा नियम निश्चित केला होता.
एखाद्या महामार्गावर अपघात झाल्यास कुणी वाहनं चालवणं थांबवत नाहीत त्याचप्रमाणे. लॉकरमधून चोरीची घटना घडली तर याचा अर्थ असा होत नाही की लॉकर असुरक्षित आहेत, असे बँकचे एका माजी अधिकारी यांनी म्हटलं आहे. तसेच आरबीआयच्या निर्देशानुसार बँका सजग होतील आणि स्ट्रॉंगरूमची सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वासही संबंधित अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
बँकच्या लॉकरमध्ये ठेवलेले सामान पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर लॉकरचा वापर करा. लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या दागिन्यांच्या पावत्या सांभाळून ठेवा. नवीन दागिने खरेदी केले असतील तर त्याच्या देखील पावत्या जपून ठेवा. जुने दागिने असतील तर त्याचे व्हॅल्यूएशन केल्यानंतरच दागिने लॉकरमध्ये ठेवावे. व्हॅल्यूएशनची पावती सांभाळून ठेवा. तुमच्या लॉकरचे नुकसान झाल्यास ही कागदपत्रे आणि पावत्या तुम्हाला भरपाई करून देण्यास फायदेशीर ठरतात.
Bank Locker Reserve Bank of India Rules Court order