नागपूर – आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असावा, जेणेकरून आपल्या शरीराला योग्य ती पोषणतत्त्वे मिळतील. पण अलीकडच्या काळात फळे नैसर्गिकरित्या पिकू देण्यापेक्षा आधीच पिकवली जातात. अशी फळे आपल्याला हानीकारक ठरू शकतात. मग हे ओळखायचे तरी कसे, तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
असे ओळखू शकाल
नैसर्गिकरित्या जर केळी पिकलेले असेल तर त्याच्या सालावर काळ्या रंगाचे डाग असतात. तसेच सालाचा रंग डार्क पिवळा असतो. अशी केळी अत्यंत स्वादिष्ट असतात. तर कार्बाइडने पिकवलेल्या केळीच्या सालाचा रंग हा फिकट पिवळा असतो. तर साल काळ्याऐवजी हिरवे असते. अशी केळी लवकर खराब होतात. जी केळी नैसर्गिकरित्या पिकलेली असतात, ती सगळ्या ठिकाणी सारखीच पिकलेली असतात. याउलट कार्बाईडने पिकवलेली केळी ही कुठे जास्त तर कुठे कमी पिकलेली असतात. काही लोकांच्या मते जे केळे पाण्यात तरंगते ते नैसर्गिकरित्या पिकलेले नाही. कारण अशी केळी पाण्यात डुबते. तर कार्बाईडने पिकवलेली केळी पाण्यावर तरंगते.
काय असतो धोका
कार्बाईडने पिकवलेली केळी ही आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. अशा केळ्यांचे प्रमाण आहारात जास्त असेल तर याचा पोटावर परिणाम होतोच पण लिव्हरचे देखील नुकसान होते. असेही आढळून आले आहे की, कार्बाईड हे कॅन्सर होण्यास उद्युक्त करते.
केळीचे फायदे
केळीत अनेक पोषकद्रव्ये असतात. व्हिटॅमिन ए, बी – 6, आयर्न, फॉस्फरस, कॅल्शिअम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रोज केळे खाणे फायद्याचे ठरू शकते.