मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या पक्षावर नाराज असून ते काँग्रेस सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. तसेच, चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अनेक आमदार फुटणार असल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, या सर्व अफवा आहेत. हे सर्व वृत्त खोडसाळपणाचे असून लोकांची दिशाभूल करणारे आहेत. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहे. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बघा, थोरात यांची ही सविस्तर प्रतिक्रीया
https://twitter.com/bb_thorat/status/1565667223733403648?s=20&t=H4rCZwqN_ihqKcdqiRriWQ
Balasaheb Thorat Congress Leader Ashok Chavhan
Politics