मनमाड – मनमाडचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे आज हृद विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ४ वाजता इंदिरा नगर येथून निघणार आहे. बाळासाहे पाटील हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचा राज्यात व राज्याबाहेरही मोठा मित्र परिवार आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्था, जयभवानी व्यायामशाळा याचे ते पदाधिकारी होते. त्यांनी स्थापन केलेल्या युवक क्रांती मंडळाने अनेक तरुण जोडले. या संस्थेच्या माध्यमातूनच त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शहरात वेगळा ठसा उमटवला. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक दिलीप पाटील यांचे ते लहान बंधु आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.