इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बाहुबली’ने अनेक रेकॉर्ड मोडले आणि त्यासोबतच सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये अभिनेता प्रभासचा समावेश झाला. या चित्रपटानंतर तो अत्यंत लोकप्रिय झाला आहे. ‘बाहुबली’पूर्वी २० कोटी आकारणारा प्रभासचा आता सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये समावेश झाला आहे.
या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि त्याच्या झालेल्या कौतुकामुळे प्रभासने त्याची फी चांगलीच वाढवली आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा आता भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. या चित्रपटामुळे त्याला फक्त नावच मिळालं नाही तर प्रसिद्धीबरोबरच पैसाही भरपूर मिळाला. या चित्रपटानंतर त्याने त्याच्या मानधनामध्ये कैक पटींनी वाढ केली.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि त्याचा सिक्वेल ‘बाहुबली २’ हे दोन्ही चित्रपट तुफान गाजले. ‘बाहुबली’ इतकाच किंबहुना त्यापेक्षाही थोडा जास्त प्रतिसाद ‘बाहुबली’च्या स्क्वेलला मिळाला. जगभरातून त्याने १००० हून अधिक कोटींची कमाई केली. या चित्रपटातील प्रभासच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या चित्रपटामुळे त्याचा चाहता वर्गही प्रचंड वाढला. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि त्याच्या झालेल्या कौतुकामुळे प्रभासने त्याची फी चांगलीच वाढवली.
‘बाहुबली’पूर्वी प्रभास एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन आकारात असे. ‘बाहुबली’साठीही त्याला तेवढेच मानधन मिळाल्याची चर्चा होती. पण ‘बाहुबली’ला मिळालेल्या यशानंतर त्याचे मानधन २० कोटींवरून थेट १०० कोटींवर गेल्याची चर्चा आहे. ‘राधे श्याम’ चित्रपटासाठीस त्याने शंभर कोटी मानधन आकारलं होतं. त्यानंतर त्याने त्याचं मानधन वाढवून १०० कोटींहून थेट १५० कोटींवर नेलं आहे.
त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’, ‘स्पिरिट’, ‘सालार’ या चित्रपटांसाठी त्याने १५० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबरोबरच या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तो आकारात असलेल्या मानधनाची सर्वत्र चर्चा आहे. या तगड्या मानधनामुळे आता तो थेट खान कलाकारांच्या पंक्तीत बसण्याची शक्यता आहे. तो घेत असलेल्या मानधनाचा आकडा ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.
Bahubali Fame South Actor Prabhas Movie Fees