अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सब जूनियर्स युथ गेम नॅशनल चॅम्पियनशिप २०२२-२३ न्यू दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत बागलाण एज्युकेशन सोसायटी सटाणा इंग्लिश मीडियम च्या चौघा खेळाडूंनी स्केटिंग मध्ये गोल्ड मिळेल पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, माजी सैनिक महेश गांगुर्डे यांची कन्या अनुष्का गांगुर्डे (१२) माजी सैनिक भाऊसाहेब खैरनार यांची कन्या मृण्मयी खैरनार (१३) विनीत महेंद्र कोर (१४) युग निलेश शहा (१२) या सर्व खेळाडूंनी आपल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावल्याने त्यांची नामपूर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.