नाशिक – दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या पावसाच्या सरी, धुके, थंडी आणि ढगाळ हवामान असे वातावरण आहे. कोरोनाच्या संकट काळातच अशा प्रकारचे विपरीत हवामान तयार झाल्याने त्याचा मोठा परिणाम मानवी आरोग्यावर होणार आहे. त्यातच ओमिक्रॉन या नव्या कोरोना अवताराने सर्वत्र धडकी भरवली आहे. म्हणून सर्वांनी योग्य ती खरबदारी घेणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रतिकूल हवामानात आपण आरोग्याचे रक्षण कसे करावे याविषयी माहिती देत आहेत डॉ. पल्लवी वैभव येवले. बघा हा व्हिडिओ