आझादी का अमृत महोत्सव : ७५ कमळ कुंड
चला जागतिक वसुंधरा दिना निमित्ताने, कमळ बाग फुलुवूया अन आझादी का अमृतमहोत्सव साजरा करुया…!!
शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पुर्ण होत आहेत. या औचित्यावर आपण आपल्या आपल्या देशाच्या निसर्गमानचिन्हांपैकी एक अन राष्ट्रीय फुलाचा दर्जा प्राप्त असलेल्या कमळाची लागवड करण्याचा निर्धार केला आहे.
बहुगुणी अश्या ह्या कमळ पुष्पाचे, आपण 75 कमळ कुंड उभारून त्यामध्ये 75 वेगवेगळ्या प्रजातीचे कमळ पुष्प लावणार आहोत. नेहमीप्रमाणे परंपरेनुसार संगोपनाची जबाबदारी ‘आपलं पर्यावरण संस्था’ घेणार आहे. कमळ हे ह्या धर्तीवर चे फुलांच्या प्रकारातील सर्वात सुंदर फुल म्हणून ओळखले जाते. ह्या निमित्ताने कमळ फुलाविषयी जनप्रबोधन होऊन त्याचा नैसर्गिक आधीवास टिकवून राहण्यासाठी मदत होईल. कमळ ह्या वनस्पतीचे महत्व लोकांना कळावे. कमळ वनस्पतीमध्ये आयुर्वेदानुसार खूप काही औषधी गुणधर्म वेगवेगळ्या विकारांवर या औषधी गुणधर्माचा उपयोग होतो. सौंदर्यप्रसाधनामध्ये ही कमळाचा उपयोग केला जातो. अश्या ह्या बहुपयोगी वनस्पती चे ,त्या अनुषंगाने लोकांमध्ये कमळ शेती करण्याचे प्रबोधन व्हावे व त्या मधूनचांगल्या प्रकारे उद्योग उभे राहुन लोकांना उपजीविका मिळावी हा यामागचा उद्देश आहे.
कमळ बाग आपण “नाशिक वनराई” म्हसरूळ येथे लोकसहभागातून फुलविणार आहोत. त्याचे काम सुरु झाले आहे. ह्या कमळ लागवड प्रकल्पाकरिता आपली संस्था लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी ह्या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत देणगी देत एक कमळ कुंड कायमस्वरूपी दत्तक घ्यावे. दत्तक घेतलेल्या कमळ कुंडावर संबंधित पालक चे नाव किंवा त्यांच्या संस्था, फर्मचे नावदेखील अगदी ठळकपणे लिहिण्यात येणार आहे. कमळबागेचे उदघाटन २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यावर केले जाणार आहे.
सहभागासाठी संपर्क:- ९४२२२६७८०१/९१३०२५७८०१