नवी दिल्ली – देशातल्या सर्व नागरिकांनी ‘डिजिटल ज्योती’वर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वहावी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बळ द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. पंतप्रधान ट्वीटर संदेशांमध्ये म्हणाले आहेत: “आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना विशेष स्वरुपातून आदरांजली! डिजिटल ज्योत, तंत्रज्ञानाचा वापर करुन आणि तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञतेचा संदेश देण्याची सुविधा देणारे साधन आहे. “दिल्ली मधील सेन्ट्रल पार्क येथे एक स्काय बीम लाईट बसवण्यात आला आहे. आपण प्रत्येकाने ऑनलाईन स्वरूपात वाहिलेली श्रद्धांजली डिजिटल ज्योतीची रोषणाई अधिक वाढवेल आणि आपल्या कृतज्ञ भावना पोचवल्या जातील. या आगळ्या वेगळ्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बळ द्या.”
https://twitter.com/narendramodi/status/1550754112417198080?s=20&t=5kdBNigfw6s8inU3fe61NQ
https://twitter.com/narendramodi/status/1550754589535678471?s=20&t=zQLpWYrNLX2b7foZb8-ZAg