इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आधुनिक काळात अनेक वाहने आपल्याला रस्त्याने धावताना दिसतात. कार, टेम्पो, बस, दुचाकीचे नानाविध प्रकार आहेत. कारचे तर अनेक रंग असतात परंतु कोणती वाहन कोणते असो त्या वाहनाचे टायर मात्र काळात रंगाचे असते, याचा कोणी विचार केलाय का? पूर्वी पांढऱ्या रंगाची टायार होते, मात्र कालांतराने त्यामध्ये बदल करण्यात आला, कारण कालांतराने टायर्स तयार करणाऱ्या कंपनीच्या हे लक्षात आलं की, पांढऱ्या रंगामुळे चाक हे कमी काळ त्याच्या मूळ स्वरूपात रहाते, नंतर ते काळे होते.
चाकाचं आयुर्मान वाढवण्यासाठी त्यामध्ये कार्बन समाविष्ट करण्याचा पर्याय संशोधनात समोर आला होता.२० व्या शतकात तंत्रज्ञानात अजून सुधारणा झाली आणि काजळीला ‘कार्बन ब्लॅक’ या रंगाने बदलून टाकलं. त्याआधी ‘झिंक ऑक्साईड’ हे टायर मध्ये वापरलं जायचं ज्यामुळे टायरचा रंग हा पांढरा रहायचा. कार्बन ब्लॅकचा समावेश केल्यानंतर टायर्स हे आधीपेक्षा किती तरी जास्त काळ म्हणजेच जास्त किलोमीटर्स पर्यंत त्यांच्या ग्राहकांना साथ देऊ लागले.
टायर्स स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा टायर्सचा काळा रंग हा जास्त पसंत केला जाऊ लागला. पांढरे टायर्स स्वच्छ ठेवणं आपल्यालासुद्धा खूप अवघड गेलं असतं. पण, हे एकच कारण नाहीये ज्यामुळे टायर्सचा रंग हा काळा ठेवण्यात आला. कार्बन ब्लॅक हे टायर्सची सूर्याच्या अल्ट्राव्हॉइलेट म्हणजेच अतिनील किरणांपासून सुरक्षा करणारं ‘कवच’ म्हणून काम करत असतं. वातावरणातील ओझोन आणि अतिनील किरणे ही रबरला वितळवू शकतात. या दोन्ही पासून टायर्सची सुरक्षा ही कार्बन ब्लॅक मुळे होत असते.
आजच्या काळातला चाक किंवा टायर हा प्रकार म्हणजे पूर्वापार चालत आलेली गोल आकारातील अशी गोष्ट, जी दळणवळण सुखकर बनवते. लाकडी चाकापासून ते वाहनाच्या स्टीलच्या चाकापर्यंत आपली प्रगती झाली आहे. मोटर सायकल किंवा कार म्हटलं की या चाकांना जबरदस्त घर्षणाचा सामना करावा लागणार, म्हणूनच यातून चाकाला रबरी आवरण चढवलं जाऊ लागलं.
साधारण रबरने तयार केलेला टायर घर्षणामुळे लवकर झिजतो. त्यामुळे पूर्वी त्याला वारंवार बदलावे लागे. पुढे या समस्येवर संशोधन झाले आणि यातून एक नामी उपाय शोधण्यात आला. रबरी टायर तयार करताना त्यात सल्फर आणि कार्बन मिसळण्यात आले आणि यातून एक मजबूत टायर तयार झाला. हा टायर १ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर न झिजता पळू शकणार होता.
कार्बन आणि सल्फरमुळेच टायरला त्याचा काळा रंग मिळाला. हा फॉर्म्युला इतका जबरदस्त लागू झाला की याला आजतागायत कोणी बदललेलं नाही. गाडी कितीही स्टायलिश असली तरी टायर मात्र काळाच ठेवला जातो. तसे पाहाता चाकांचा आकार आणि जाडी वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या वाहानांसाठी वेगवेगळे टायर लावले जातात.
टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल इतका मजबूतही नसतो आणि रोड्सवर उत्तम प्रकारे कामगिरी करु शकेल असाही नसतो. यासाठीच मिल्की व्हाईट रबराला आणखी मजबूत करण्यासाठी काही पदार्थ एकत्र केले जातात. त्यात ब्लॅक कार्बनचा समावेश असतो. यामुळे टायरचा रंग काळा होतो तसेच टायर मजबूत होतं आणि दिर्घकाळ टिकतं.
कार्बनमुळे ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी होते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत. याशिवाय कार्बनमधील ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षित ठेवतो. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे हे पाहणं आवश्यक ठरते.
Automobile Vehicle Tire Color Black Reason Science
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD