मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वस्त, सुंदर आणि सुरक्षित कार घेण्याचे सामान्यांचे स्वप्न मारुती पूर्ण करणार आहे. पुढील महिन्यात मारुती सुझुकी एक नवीन कार लाँच करत आहे. सात लाख किंमत असलेली ही कार आजवरची सर्वाधिक सुरक्षित कार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मारुती फ्राँक्स असे या कारचे नाव आहे.
नुकत्याच झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुती सुझुकीने आपली फ्राँक्स ही कार पहिल्यांदाच सर्वांपुढे आणली. लवकरच ही कार बाजारात लाँच होणार आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये ड्युअल टोन इंटिरियर सोबत लेटेस्ट फीचर्स आहेत. ज्यात वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सपोर्ट सोबत ९ इंचाची स्क्रीन, सुझुकी कनेक्ट, व्हाइस कमांड, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, एचयूडी, ३६० डिग्री कॅमेरा, ईएसपी, रियर एसी वेंट्स आणि ६ एअरबॅगसह अनेक फीचर्स असतील. मारुती सुझुकी ७ एप्रिल २०२३ पर्यंत फ्राँक्सच्या किमती जाहीर करेल. मारुती फ्राँक्स ही कार टाटा पंच, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर, टियागो एनआरजी, आणि सिट्रोएन सी३ या कारला तगडी स्पर्धा देणार आहे.
अकरा हजारात बुकींग
मारुती सुझुकीने फ्राँक्सची बुकींग सुरू केली आहे. ग्राहकांना केवळ ११ हजारात बुकींग करता येणार आहे. आकर्षक फ्रंट लूक, चांगला ग्राउंड क्लीअरन्स आणि कमी बूट स्पेस ही कारची वैशिष्ट्ये आहेत. प्राप्त माहितीनुसार, मारुती फ्रॉन्क्स सिग्मा बेस मॉडेलची किंमत सुमारे ६.५६ लाख रुपये (एक्स-शोरूम) राहणार आहे.
Automobile Maruti New Fronx Safest Car