नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – आजच्या काळात बहुतांश शहरांमध्ये मोठमोठया गगनचुंबी इमारती असून त्यांच्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. परंतु अनेक वेळा लिफ्ट मध्ये बिघाड झाल्यास ती बंद पडून अपघात किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी वेळ काही जणांवर आली असेल परंतु खुद्द एका क्रिकेटपटूवर देखील लिफ्टमध्ये अडकून पडण्याची वेळ आली होती. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जवळपास तासभर लिफ्टमध्ये अडकून पडला होता. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. स्मिथचा सहकारी क्रिकेटपटू लॅबुशेन दार उघडण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ गुरुवारी मेलबर्नमधील हॉटेलमध्ये लिफ्टमध्ये अडकला. सुमारे तासभर ते लिफ्टमध्ये अडकल्याने मोठा अपघात टळला. स्मिथसोबतच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या दरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि त्याचा सहकारी फलंदाज मार्नस लॅबुशेन यांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी या घटनेचे इंस्टाग्रामवर ‘लाईव्ह-स्ट्रीम’ केले. रॉडच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना लॅबुशेनने स्मिथला काही चॉकलेट्स खायला दिली.
सुमारे 55 मिनिटे वाट पाहिल्यानंतर तंत्रज्ञ हॉटेलमध्ये आले तेव्हा स्मिथला त्याच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. स्मिथने इंस्टाग्रामवर एका व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी सध्या लिफ्टमध्ये अडकलो आहे पण दरवाजे उघडत नाहीत.
व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणतो की, “मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मी ते एका बाजूने थोडेसे उघडले , मार्नस लाबुशेने दुसर्या बाजूने ते उघडण्याचा प्रयत्न केला, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मार्नसने माझ्यासाठी काही खायलाही आणले. शेवटी मी त्या लिफ्टमधून बाहेर पडलो. तो नक्कीच एक अनुभव होता. मला माझ्या आयुष्यात ही 55 मिनिटे परत कधीच बघायची इच्छा नाही.
7 क्रिकेटने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘स्टीव्ह स्मिथ लिफ्टमध्ये अडकलेल्या घटनेचा व्हिडिओ’ असे लिहिले आहे. विशेष म्हणजे स्टीव्ह स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियाचा कसोटी उपकर्णधार आहे. सध्याच्या अॅशेस मालिकेतही त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले.