औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे विजयी झाले आहेत. याठिकाणी मोठी चुरस होती. त्यामुळे राज्यभराचे लक्ष इकडे लागले होते. काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. काळे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे. मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यामुळे निकाल उशीरा जाहीर झाला आहे.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण २० हजार मते मिळाली. भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार मते मिळाली. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना १३ हजार मते मिळाली आहे. एकूण २ हजार मते बाद झाली.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1621144396094922756?s=20&t=kuvQaHgUhiI1xrMPMbxBWQ
महाविकास आघाडीने नागपूर पाठोपाठ औरंगाबादमध्येही भाजपला धोबीपछाड दिले आहे. भाजपने आतापर्यंत कोकणची जागा जिंकली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. तर, कोकणमध्ये भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.
दरम्यान, अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत मतमोजणी सुरू आहे. तेथे अतिशय चुरशीची लढत होत आहे.
Aurangabad Teacher Constituency Election Result Declared