मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील दोन शहरांचे नामांतर झाले आहे. इथून पुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन बरेच राजकारण यापूर्वी रंगले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी जून २०२२ महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. जु लै २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ऑगस्टमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात नामांतराचा हा प्रस्ताव दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. आता त्याला केंद्रानेही मंजुरी दिली आहे. तसे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांच नावे आता बदलली आहेत.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1629114071017742336?s=20
Aurangabad And Osmanabad Name Change