India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतात विक्री होणार फक्त ५० आलिशान कार; ऑडीच्या या आलिशानमध्ये असं काय आहे खास?

India Darpan by India Darpan
September 18, 2022
in राज्य
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑडी ही भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या आलिशान कारपैकी एक आहे. भारतात सुरुवातीच्या काळात ज्या काही कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या त्यामध्ये या जर्मन कंपनीचा समावेश होतो. आता या कंपनीकडून Audi Q7 ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारची लिमिटेड एडिशन भारतात विक्री होणार आहे. म्हणजे भारतात अवघ्या ५० कारच विक्री होणार आहेत. त्यामुळे या कारची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कारची खासियत आपण आता जाणून घेणार आहोत.

नवी Q7 या लिमिटेड एडीशन एसयुव्ही ट्रिमला टेक्नॉलॉजी व्हेरीएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या नव्या एडीशनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. ही कार बैरिक ब्राऊन रंगात देखील उपलब्ध होणार आहे. आता भारतात या एसयुव्हीचे फक्त ५० युनिट्स विकले जाणार आहेत. नव्या सील ट्रिमबरोबर ही एसयुव्ही लाँच करण्यात आली आहे. यात ४८.२६ सेमी (R१९) ५-आर्म स्टार स्टाइल डिझाइन अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ आणि हाय-ग्लॉस स्टाइलिंग पॅकेज उपलब्ध आहे.

या कारमध्ये नव्या मेट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, सिंगल फ्रेम ऑडी ग्रिल आणि एयर इंटेकची सुविधा आहे. Audi Q7 ने आपला लूक पूर्ण बदलला आहे. यामध्ये वेगवेगळा कलर ऑप्शन उपलब्ध आहे. Audi Q7 मध्ये नव्या बॉडी क्लॅडिंग आणि अत्याधुनिक बंपर सेट अप आहे. सदर कारच्या इंटेरियरमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे आणि यामध्ये नवीन ट्वीन स्क्रिन सेंटर कंसोल आहे. Audi Q7 च्या संपूर्ण डिझाईन बदलण्यात आलं आहे आणि त्यामुळे त्याला एक शानदार लूक मिळाला आहे. इंटिरिअरमध्ये नव्या क्रोम, अॅल्यूमिनिअम हायलाईट्स सोबतच दोन टचस्क्रिन आणि एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.

प्रीमियम ऑडियो सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि हेड-अप डिस्प्ले सहित इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्वच नव्या ऑडी कार प्रमाणे Audi Q7 ही देखील पेट्रोल कार आहे पण V6 यूनिट सोबत माईल्ड हायब्रिड आणि काही इलेक्ट्रिकल असिस्सटन्स असेल. Audi Q7 च्या कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यात आली आहे तसेच त्यामध्ये कार्टो सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. Audi Q5 च्या विक्रीमध्ये अधिक जलदता आणण्याचा प्रयत्न करत आहे. या कारची किंमत ८८ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे. ही नवीन एसयुव्ही रॅपराउंड कॉकपिट डिझाइनसह उपलब्ध आहे.

ही कार ३४० bhp पॉवर आणि ५०० ​​Nm टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड २५० किमी/तास आहे. विशेष म्हणजे ५.९ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते. तसेच क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह, अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएंसी ऑफ-रोड, ऑल-रोड या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ऑडी Q7 चे विशेष परफॉर्मन्स क्वालिटी या कारला इतर सर्व वाहनांपेक्षा वेगळी आहे.

Audi Q7 Will Sale In India only 50 Units Features Price
Automobile Luxurious


Previous Post

योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशातील मदरशांचे सर्वेक्षण सुरू; होणार सर्वच चौकशी

Next Post

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Next Post

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group