नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “असोसिएशन ऑफ कन्स्लटिंग सिव्हिल इंजिनिअर्स (इंडिया), नाशिक” या संस्थेच्या नवनिर्वाचित समितीचा (२०२३-२५ ) पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज, ९ जुन रोजी सायंकाळी ६.४५ वा. एक्सप्रेस रॉयल हॉल, हॉटेल एक्सप्रेस इन येथे हा सोहळा होणार आहे.
नाशिक संस्थेच्या २०२३-२५ या कार्यकाळासाठी इंजि. अनिल कडभाने यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच इंजि .अमित अलई यांची संस्थेचे सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, खजिनदार म्हणून इंजि .लीलाधर जावळे हे कायम आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून निलेश भाटी , संदीप जाधव,सचिन भागवत , नरेंद्र भुसे , अमित सानप , मेघल पवार यांची निवड झाली आहे.
संस्थेचे श्री विजयकुमार सानप यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच श्री पुनीत राय यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष ( पश्चिम) पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे तसेच राजुरी स्टीलचे संचालक श्री संतोष मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे मावळते चेअरमन इंजि संतोष काठे हे त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेणार आहेत. संस्थेचे मावळते सेक्रेटरी इंजि समाधान गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. खासदार हेमंत गोडसे तसेच संस्थेचे राष्टीय अध्यक्ष श्री विजयकुमार सानप हे सभासदांना संबोधित करणार आहेत. तसेच नवीन समितीला मार्गदर्शन करणार आहेत.
यानंतर इंजि.सलीम शेख (M. Tech Structure) यांचे ” “Role of Structural Reinforcement in Earthquake” या विषयावर तांत्रिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राजुरी स्टीलचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी इंजि .रवींद्र धनाईत , इंजि .ज्ञानेश्वर गोडसे इंजि .महेंद्र शिरसाट तसेच संस्थेचे जेष्ठ सभासद व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Association of Consulting Engineers Nashik