मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटच्या विविध स्पर्धांकडे खेळाडूंची नावे तर प्रेक्षकांचे देखील लक्ष असते. आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप होय, यंदाच्या आशिया कप 2022 साठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल.
भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.
यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
सदर टुर्नामेंट ही 28 ऑगस्टपासून होणार असून टीम इंडियाचा सध्याचा सर्वात चांगला बॉलर जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये सहभागी नसेल. पाठीच्या दुखापतीमुळे तो या टुर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही अशी माहिती आहे. त्याची सध्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी त्याला आधी विश्रांती देण्यात आली असण्याची शक्यता आहे.
हर्ष पटेलही दुखापतीमुळे एशिया कपसाठी टीममध्ये समाविष्ट नसेल असे बीसीसीआयने सांगितले आहे. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन प्लेअर्सची नावे स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिलेली आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 13 पैकी सात वेळा चॅम्पियन राहिलेली आहे. यासह तीन वेळा ती फायनला जाऊन जिंकू शकलेली नाही. यात दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. श्रीलंका पाचवेळा चॅम्पियन राहिलेली आहे आणि सहा वेळा रनर अप राहिलेली आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी या एशषिया कपमध्ये टीम इंडियाला मिळणार आहे. 28 ऑगस्टला टीम इंडियाचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असणार आहे. यावेळी एशिया कपचे यजमानपद श्रीलंकन क्रिकेट बोर्ड करते आहे. श्रीलंकेत असलेल्या आर्थिक संकटांमुळे पहिल्यांदा एशिया कपच्या मॅचेस या दुबईत होतील अशी चर्चा होती. 21ऑगस्टपासून क्वालिफायर मॅचेस सुरु होणार आहेत. यात दुबई, ओमान, नेपाळ, हाँगकाँगसहित इतर टीम असणार आहेत.
Asia Cup Indian Cricket Team Players