नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका बिल्डकॉनने गुजरातच्या नर्मदा नदीवर देशातील पहिला आठ मार्गिका (लेन) असलेला पूल विक्रमी काळात उभारून आपल्या गौरवशाली परंपरा वाटचालीतील एक मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या पूल उभारणी काळात नर्मदा नदीला दोन वेळा महापूर येवूनही जिद्द आणि कल्पकता या गुणांच्या जोरावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली.
दरम्यान, देशातील पहिला आठ मार्गिका (लेन) असलेला पूल उभारण्याची अद्वितीय कामगिरी केलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेडचा दि असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अर्थात ‘असोचेम’च्या वतीने गौरव करण्यात आला. सदर पूल निर्माणासाठी ‘अशोका’ला ‘वर्षातील सर्वोत्तम पूल निर्मिती’ (Landmark Bridge Projet of The Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे झालेल्या ‘असोचेम पायाभूत सुविधा परिषद आणि पुरस्कार २०२३’ सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोका समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख आणि संचालक आशिष कटारिया यांनी पुरस्कार स्वीकारला.
Ashoka Buildcon Awarded for 8 lane Bridge