बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

छगन भुजबळ…..सियासती सच की भी इम्तिहान; प्रा. डॉ. अशोक पिंगळे

by Gautam Sancheti
सप्टेंबर 9, 2021 | 7:30 pm
in इतर
0
chhagan bhujbal1

नामदार छगन भुजबळ…..
सियासती सच की भी इम्तिहान …..
“ आज कल सियासती सच की भी इम्तिहान
होती है
ज़िंदगी तेरे हर इम्तिहान में अव्वल आना जुनून है मेरा “
असंच काही आयुष्य नामदार भुजबळ साहेबांचे, संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला, ईडी सीबीआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय आयुष्य उध्वस्त करतानाच वैयक्तिक द्वेषाचे केंद्र सरकारच्या राजकारणामुळे राजकीय व्यक्तींनी त्यांच्या सावली पासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे अशीच सध्या राजकीय क्षेत्रातील अनेकांची अवस्था, त्यातील विविध राजकीय घटनांचा जर विचार केला तर हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही, आज महाराष्ट्र सदन बांधकामा संदर्भात नामदार भुजबळ साहेबांना दोषमुक्त करताना न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे, परंतु याद्वारे भुजबळ साहेब फीनिक्स पक्षाचं दुसरं नाव आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही

गेल्या पंधरा वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला तर हरसूल पासून येवला, मुंबई पासून नाशिक यासारख्या तीन-चार पदरी रस्त्यांचे आधुनिक जाळे, चांदवड, मनमाडपर्यंत व्हाया पुनेगाव, 11.5 किमीचा बोगद्याद्वारे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या जीवनात केलेली क्रांती, नाशिक शहरातील फ्लाय ओव्हर, नाशिक विमानतळ उभारणी , ग्रीन जीम संकल्पना, वणी येथील नवतंत्रज्ञानयुक्त फर्नीक्यूलर ट्रॉली सेवा, ज्या महाराष्ट्र सदनामुळे माध्यमांनी जाणीवपूर्वक बदनामी केली त्या सदनाच्या भव्यदिव्य व अत्याधुनिक सोयींनीयुक्त महाराष्ट्र सदन ज्यांनी बघितले असेल त्यांना भुजबळ साहेबांच्या वैश्‍विक दूरदृष्टीची कल्पना येऊ शकते. कारण त्या सदनामुळे तमाम भारतीवासीयांना महाराष्ट्र राज्याची नवीन सांस्कृतिक ओळख झाली हे तितकेच खरे.

महाराष्ट्राच्या नकाशात येवला पैठणी हबमुळे असो किंवा इतर अनेक लोकहिताची कामे असो त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय कुणालाच घेता येणार नाही आणि असलेले कोणी हिरावून घेतो म्हटले तरी घेऊ शकत नाही. कारण मधल्या प्रतिकुल काळात त्यांनी जे भोगलं त्याने जीवनातील असहाय्यता, दु:खाच्या व एकाकीपणाच्या सर्व सिमा पुसल्या गेल्या आहेत. आज भुजबळ साहेबांची फिनिक्स पक्षाप्रमाणे एक नवी ओळख जिल्ह्याला होत आहे. बहुजन समाजाचा कळवळा असलेला पवार साहेबांनंतरचा एकमेव धडाडीचा नेता आजमितीस महाराष्ट्रात ऐवज म्हणून आहे. नाशिक जिल्हावासीयांच्यादृष्टीने अभिमानास्पद आहे. शेवटी वडिलकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना नेहमीच सामाजिक सौदार्हाची भूमिका निभवावी लागते ती ते इमाने इतबारे निभवत आहेत त्यासाठी संवाद महत्त्वाचा, सर्वांचाच एकमेकांशी….महाराष्ट्राच्या राजकारणात जबाबदारीने काम करणारा एक बहुजन समाजाचा नेता मग ते महाराष्ट्राच्या राजकारणात विविध खात्याचे मंत्री असो किंवा विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करणार्‍या नाशिकचे पालकमंत्री म्हणून असो या माणसाच्या विविध विषयाच्या आकलनाच्या सीमा अमर्याद आहे हे या काळात स्पष्टपणे जाणवते. वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करत असताना घेतलेले दमदार निर्णय अत्यंत पारदर्शीपणे तर कधी कधी प्रशासनाला जाब विचारण्याची धमक किंवा निर्णय घेताना लोकांच्या हिताकरीता, लोकांच्या इच्छेला मान देऊन घ्यावयाचे त्यांचे तंत्र प्रत्येक नवीन राजकीय नेत्यांनी आत्मसात करावे असे आहे. निर्णय महत्वाचे की लोक, त्या प्रत्येकवेळी भुजबळ साहेबांनी लोकांचा विचार केला याची प्रचिती कोविड लॅब उभारणी असो, व इतर सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्याचे काम असो किंवा इतर खरंतर कोरोना संसर्ग काळात लोकांच्या जीवनातील दैन्य दूर करणे व पोटाची खळगी भरण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांच्या वाट्याला आले असे नशीब लाभणे भाग्याचेच लक्षण. महाराष्ट्राच्या जनतेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच जणू…

व्यवस्थेतील सामाजिक जाण असलेला योद्धा (social warrior) म्हणून संबोधण्यात येईल हे मात्र निश्‍चित. राजकीय हेतूने निर्माण केलेल्या आरोपांच्या सर्व तोफा न्यायालयाच्या माध्यमातून आज भुजबळ साहेबांनी नेस्तनाबूत केल्या कारण सत्य हे त्यांच्या समवेत होते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रातील संघर्षानेच त्यांना नवसंजीवनी दिली. जणू काही –
हर कदम पे शिकस्त ने यूँ हौसला दिया
जिस तरह कदम-ब-कदम पे कोई हमसफर चले
(शिकस्त – पराभवातून शिकणे)
– प्रा. डॉ. अशोक पांडुरंग पिंगळे
माजी संचालक, मराठा विद्याप्रसारक समाज

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कर्मयोगीनगरच्या नाल्यावर लहान पूल बांधा,रस्ता दुरूस्त करा; शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी

Next Post

लासलगावला रेल्वेच्या डीआरएम समोर शेतक-यांचे गा-हाणे; किसान रेलचा कांदा नगरीला फायदा नाही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20210909 WA0224

लासलगावला रेल्वेच्या डीआरएम समोर शेतक-यांचे गा-हाणे; किसान रेलचा कांदा नगरीला फायदा नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011