शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मा. प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त आढावा….

by Gautam Sancheti
मे 20, 2022 | 11:17 am
in इतर
0
IMG 20220520 WA0006

 

प्रयोगशील शिक्षणव्रती प्रा. डॉ. आर. शिंपी

  • प्रा. डॉ. उत्तम करमाळकर

शिक्षणक्षेत्रातील एक आनंदयात्री, प्राध्यापक, विभागप्रमुख, उपप्राचार्य, प्राचार्य, संचालक, चिकित्सक लेखक, संशोधक, संशोधन-’मार्गदर्शक, संयोजक, समन्वयक, संवेदनशील व शिस्तप्रिय प्रशिक्षक असे सृजनशील व्यक्तिमत्त्व अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या श्रध्देय गुरूकृपेने घडलेले डॉ. के. आर. शिंपी यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये ५१ वर्षाच्या आपल्या सेवाकार्यातून आदर्श शिक्षक-संशोधकाचा एक वस्तुपाठ उभा केला आहे. “या प्रदीर्घ कालावधीत त्यांची कामगिरी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात सुसंवादी वातावरणातून परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी निर्माण झालेला एक उत्कृष्ट वस्तूपाठ आहे” – अशा शब्दांत सर डॉ. ’मो. .स. गोसावी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी शिक्षण क्षेत्रात गेली 51 वर्षे सतत कार्यरत आहेत. १९७१ ते २०२१ असा त्यांचा हा कालखंड यशोदायी आणि प्रेरणादायी असा आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महासंचालक सर डॉ. एम. एस. गोसावी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सातत्यपूर्ण आणि दिशादर्शक काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. के. आर. शिंपी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमध्ये विविध पदावर कार्य केले आहे. बीवायके महाविद्यालयात ३७ वर्षे, जेडीसी बिटको इन्स्टिट्यूटचे समन्वयक म्हणून पंधरा वर्षे, डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयांमध्ये पाच वर्षे, डॉ. एम. एस. जी. इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीजमध्ये 1 वर्ष, सर डॉ. एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे पाच वर्षे व सर डॉ. एम. एस. जी. आय. ई. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून दोन वर्षे योगदान दिलेले आहे.

डॉ. के. आर. शिंपी यांनी विद्यापीठ पातळीवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत बहुमोल कार्य केले आहे. बिझनेस प्रॅक्टिसेस अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून पंधरा वर्षे, वाणिज्य विद्याशाखेचे सदस्य म्हणून दहा वर्षे, पुनर्रचित अभ्यासक्रम सुकाणू समिती सदस्य पंधरा वर्षे, बोर्ड ऑफ व्होकेशनाल एज्युकेशनचे अध्यक्ष दोन वर्षे, ॲकॅडमिक कौन्सिल सदस्य दोन वर्षे कार्य करून वाणिज्य शिक्षणाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.
डॉ. शिंपी यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून त्यांचे पुणे विद्यापीठांतर्गत सहा विद्यार्थी पीएच.डी. झाले आहेत तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. शिंपी यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या स्टाफ ॲकॅडमीचे समन्वयक म्हणून सलग पंधरा वर्षे काम केले आहे. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी त्यांनी १२० प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन व रिसोर्स पर्सन म्हणून काम केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर ते विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळाचे उपाध्यक्ष, नाशिक शहर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे सल्लागार, संत नामदेव शिक्षण प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ कार्यकारणीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषद (MCEAM) याचे संयुक्त सचिव म्हणून गेली वीस वर्षे ते काम पाहत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन (IIPA) नाशिक ब्रँचचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्याच बरोबर इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट (ISTD) या संस्थेचे ते आजीव सदस्य आहेत. जेडीसी बिटको मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूटच्या गर्व्हनिंग बॉडीचे ते सदस्य आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापन विषयावर दहा ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यावर आधारित ‘शिक्षणव्रती’ हा गौरव ग्रंथ २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे. कार्यशाळा व परिसंवाद यामध्ये सहभाग घेऊन त्यावर आधारित १०० हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. बीवायके कॉलेजचे विद्यार्थी ते प्राचार्य १९६४ ते २०१७ ही ५३ वर्षांची वाटचाल अत्यंत उल्लेखनीय आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९२, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९४, पुणे विद्यापीठाचा जी. बी. कुलकर्णी अवॉर्ड फॉर कॉमर्स टीचर्स १९९६, कै. काकासाहेब सोलापूरकर पुरस्कार २००४, नामदेव शिंपी समाज भूषण पुरस्कार २००६ मध्ये तसेच नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४ मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये १९८३ पासून सुरू असलेल्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अमंलबजावणीत सरांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘Skills in Commerce’ या विषयांवर संशोधन करून व अध्यापनामध्ये नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून वाणिज्य शिक्षणाला एक नवी दिशा दिली आहे. केस स्टडी, प्रोजेक्ट वर्क, ग्रुप डिसकशन, इंडस्ट्रीयल व्हिजिट, सेमिनार, वर्कशॉप आणि तज्ञांची व्याख्याने यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करता येतात हे त्यांनी आपल्या संशोधन कार्यांतून सिद्ध केले आहे.
आदर्श प्राध्यापक, कार्यक्षम प्राचार्य आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं हे कार्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व समाजबांधवासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरांना हार्दिक शुभेच्छा!!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नेदरलँडमध्ये इंडिया डान्स फेस्टिव्हलचा शुभारंभ

Next Post

बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; सलग ४ दिवस बँका राहणार बंद

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; सलग ४ दिवस बँका राहणार बंद

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
IMG 20250820 WA0222 1

आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव

ऑगस्ट 22, 2025
image002MFJ9

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित…दोन्ही सभागृहात केली १५ विधेयके मंजूर

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
Untitled e1755825318843

जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑगस्ट 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011