शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे ७५व्या वर्षात पदार्पण

एप्रिल 14, 2022 | 12:44 pm
in इतर
0
IMG 20220414 WA0015

 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)

– डॉ. जयश्री सूर्यवंशी, नाशिक
13 एप्रिल 1948 रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ची स्थापना झाली. नॅशनल इंटिग्रॅटेड मेडिकल असोसिएशन ने(N. I. M. A.) 13 एप्रिल 2022 ला 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे.  सर्वप्रथम सर्व सदस्यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व BAMS आणि BUMS पदवीधारकांसाठी काम करणारी, प्रत्येक ISM पदवीधारकांची ओळख असणारी, एवढी जुनी संघटना 74 वर्षे पूर्ण करीत आहे याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. ज्या उद्देशाने संघटना स्थापन झाली त्याचा उद्देश खूप विस्तारित होता आणि आतापर्यंत बहुतांशी तो खरा ठरला आहे. याचे संपूर्ण श्रेय हे सर्व सदस्यांना, सर्व BAMS आणि BUMS पदवीधरांना जाते, ज्यांनी संघटनेवर विश्वास ठेवला. संघटनेच्या सुरुवातीपासून तन मन धनाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाते, ज्यांनी आपला अमूल्य वेळ कुठलाही स्वार्थ न ठेवता संघटनेसाठी दिला. अनेक मान्यवरांनी निस्पृह सेवा दिली. अनेक पदाधिकारी पदे घेतात, आपली कामे करतात, पुढील सूत्रे, धुरा नवीन पदाधिकाऱ्यांकडे सोपवतात. कुठल्याही प्रकारचा लोभ ठेवत नाहीत. अशी फक्त आणि फक्त काम करण्यासाठी लाभलेली माणसे NIMA साठी वरदान ठरली. संघटना नावारूपास आली. प्रत्येक राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती संघटनेत होत्या, आहेत आणि राहतील. परंतु प्रत्येकाने आपापल्या परीने संघटनेच्या हितासाठी, सदस्यांच्या हितासाठी कामं केलीत आणि करत आहेत. ही परंपरा अशीच कायम राहील आणि त्यासाठी प्रत्येक सदस्य, प्रत्येक BAMS आणि BUMS पदवीधर संघटनेच्या पाठीशी उभा राहणे आवश्यक आहे.

NIMA चे हे अमृत महोत्सवी वर्ष दि. 13 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2023 या दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
केंद्रीय NIMA च्या अहमदाबाद येथील डिसेंबर 2021आणि नागपूर येथील 13 मार्च 2022 च्या कार्यकारिणी सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा होऊन काही मार्गदर्शक तत्वे पाळून, केंद्रीय NIMA च्या मार्गदर्शनात, त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे केंद्रीय शाखाद्वारे राष्ट्रीय स्तरावर, राज्य शाखाद्वारे राज्य स्तरावर आणि जिल्हा आणि स्थानिक शाखाद्वारे जिल्हा आणि स्थानिक स्तरावर हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटाने साजरे करण्याचे ठरले आहे. केंद्रीय शाखेने दिलेल्या निर्दशांनुसार वर्षभर सामान्य नागरिकांसाठी व सदस्यांसाठी विविध विषयांवर शिबिरे, व्याख्याने, निरंतर वैद्यकीय शिक्षण अंतर्गत येणारे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. याला अनुसरून निमा नाशिक शाखा यावर्षी वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने  निमा वर्धापन दिन सोहळा 13 एप्रिल 2022 रोजी दु ४ वा. तोरणा पॅलेस, गंगापुर रोड येथे आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा आखण्यात आला. नवीन सदस्यांना संघटनेच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास निमा केंद्रिय सहकोषाध्यक्ष डॉ. शैलेश निकम, निमा केंद्रिय वेब कन्व्हेनर डाॅ. मनिष जोशी, निमा राज्य खजिनदार डॉ. भुषण वाणी, राज्य सहसचिव डॉ. अनिल निकम,  राज्य प्रवक्ता डॉ. तुषार  सूर्यवंशी, राज्य वेबकन्व्हेनर डॉ.  देवेन्द्र बच्छाव,  नाशिक शाखेच्या माजी अध्यक्ष डॉ. शरद पाटील, डॉ. जयश्री सुर्यवंशी, डॉ. राहुल पगार,  सचिव डॉ. वैभव दातरंगे,  खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ, संघटक डॉ. मनिष हिरे, वुमन्स फोरम सचिव डॉ. दिप्ती बढे,  उपाध्यक्ष डॉ. प्रसाद  देशपांडे, डॉ. सुजीत सुराणा, डॉ. व्यंकटेश पाटील इ.  तसेच निमा जिल्हा शाखेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यावेळी अमृत महोत्सव निमा राज्यस्तरीय समितीतील नाशिक शाखेचे सन्माननीय प्रतिनिधी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले.

समिती अशी
Dr. Sujit Surana      – Sports Committee
Dr. Sagar Patil                           – Marathon Committee
Dr. Madhavi Dahekar Gaikwad         – Academic Committee
Dr. Shubhada Jagdale         – Days Celebration Committee
Dr. Shruti Kulkarni           – Womens Forum Committee
Dr. Sagar Karande                  – Students Forum Committee
Dr. Pranita Gujrathi           – CME Committee
Dr. Vaibhav Datrange             – IT Cell Committee
Dr. Tushar Nikam            – Ayurved Prachar Prasar Committee
Dr. Tushar Suryavanshi       – Press And Publicity Committee
Dr. Devendra Bachchaav       – Co-Ordinator Divisional
Dr. Anil Nikam   Asst. Secretary NIMA MSB
Dr. Bhushan Wani  Treasurer NIMA MSB
Dr. Shailesh Nikam   Organising Secretary NIMA MSB

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Next Post

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून उन्हाळी सत्राच्या परीक्षांची घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून उन्हाळी सत्राच्या परीक्षांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011