बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अॅपलच्या सर्वात मोठ्या कारखान्यात २० हजार कामगारांचे कामबंद आंदोलन

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2022 | 4:48 pm
in राष्ट्रीय
0
apple

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अॅपलच्या चीनमधील प्लांटमध्ये नव्याने कामावर घेतलेल्या सुमारे २० हजार कामगारांनी काम थांबवले आहे. त्यामुळे प्रतिष्ठित ब्रँड अॅपलच्या उत्पादनांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काम थांबवून कंपनी सोडून गेलेल्या २० हजार लोकांमध्ये नव्याने कामावर रुजू झालेले अधिक कामगार आहेत आणि ते यापुढे उत्पादन लाइनवर काम करत नाहीत.

ऍपलच्या पुरवठादार फॉक्सकॉनच्या चीनमधील झेंझोऊ येथील प्लांटमध्ये काम करणाऱ्या एका सूत्राने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने म्हटले आहे की या कामगारांच्या बंदमुळे अॅपल प्लांटमधील उत्पादन लक्ष्य साध्य करण्याच्या प्रक्रियेला धक्का बसला आहे. कंपनीने नोव्हेंबरपर्यंत पूर्ण उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु कामगारांच्या अशांततेमुळे जगातील सर्वात मोठ्या आयफोन कारखान्यातील उत्पादनावर परिणाम झाला आहे.

एक दिवसापूर्वीच चीनमधील जगातील सर्वात मोठ्या अॅपल आयफोन फॅक्टरीत कोरोना लॉकआऊट आणि वेतन वादावर कर्मचाऱ्यांच्या तीव्र निषेधाची बातमी आली होती. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अनेक कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कारखान्याच्या सुरक्षा कर्मचार्‍यांशी शेकडो कामगारांची हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. कोरोनामुळे जवळपास महिनाभरापासून कारखान्यात कडक निर्बंध आणि वेतनावरील वादामुळे कामगार हतबल झाल्याच्या बातम्या येत आहेत. चीनमधील झेंगझोऊ येथील अॅपल प्लांटमध्ये ऑक्टोबरपासून तणावाचे वातावरण होते. कोरोनाच्या निर्बंधामुळे टाळेबंदी सुरू झाल्यापासून कामगारांमध्ये असंतोष वाढत होता. आयफोन सिटीमधील २ लाखाहून अधिक कामगारांपैकी बरेच जण वेगळे झाले होते. त्यांना अन्न आणि औषधे मिळण्यात अडचण येत होती.

Apple Plant 20 Thousand Workers Strike
China

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृषी दिंडीवर भाजपने केली ही खोचक टीका

Next Post

यंदाचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर; कवी डॉ. यशवंत मनोहर यांचा होणार गौरव

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2022 11 25 at 2.49.37 PM

यंदाचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर; कवी डॉ. यशवंत मनोहर यांचा होणार गौरव

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011